भारतासोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात 7.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरू झाला. नाणेफेकीसाठी या मैदानावर पाऊल ठेवताच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
तीन वर्षाच्या कालावधीनंतर भारतातील 12 शहरांमध्ये आयपीएलचा हंगाम पार पडणार आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएल दोन वेळा युएई व एकदा मुंबईतील तीन मैदानांवर खेळली गेली. त्यानंतर आता नव्या हंगामाचा पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला. या सामन्यात नाणेफेकीसाठी उतरताच एमएस धोनी हा आयपीएल इतिहासातील सर्वात वयस्कर कर्णधार ठरला.
धोनीने 41 वर्ष 249 दिवसांचे वय असताना कर्णधार म्हणून सामन्यात पाऊल ठेवले. त्याने राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याचा विक्रम मागे टाकला. वॉर्न याने 2011 मध्ये अखेरच्या वेळी 41 वर्ष 241 दिवस याच वयात अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये नेतृत्व केलेले. धोनी या संपूर्ण हंगामात चेन्नईचे नेतृत्व करणार असल्याने तो आता हा विक्रम आपल्याच नावे ठेवण्याची शक्यता आहे.
धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने तब्बल चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असून, यावेळी तो आपला अखेरचा हंगाम खेळू शकतो. तर दुसरीकडे वॉर्न हा पहिली आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार होता. पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवल्यानंतर पुढील तीन हंगामात राजस्थान संघाला त्याच्या नेतृत्वात पुन्हा तशी कामगिरी करता आली नाही.
(CSK Skipper MS Dhoni Becomes Oldest IPL Captain In IPL History Surpass Shane Warne)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय मूळ असलेल्या पठ्ठ्याची धमाल! कमी वयात यूएईविरुद्ध ठोकले शतक, वाचवली अमेरिकेची लाज
‘बाबरला खरेदी करण्यासाठी मी सगळा पैसा खर्च केला असता…’, इंग्लिश गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया





