---Advertisement---

Video: सीएसकेच्या विजयानंतर डीजे ब्रावोच्या सुरात संघसहकाऱ्यांनी मिसळला सूर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 7:10 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला. हा सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. यामध्ये सीएसकेने २७ धावांनी विजय मिळवला. यामध्ये सीएसकेच्या फाफ डू प्लेसिस या धुरंधराला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू तसेच आयपीएल संघांनीही सीएसकेच्या या विजयावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याचबरोबर सीएसकेच्या गोटातही चांगलेच आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच सीएसके संघाचा बसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सीएसकेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सीएसकेचे सर्व खेळाडू बसमध्ये असल्याचे दिसत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. विशेष म्हणजे यावेळी ड्वेन ब्रावो गाणे गाताना आणि नाचताना दिसत आहे. तसेच त्याच्या सुरात इतर खेळाडूंनीही आपला सूर मिसळला आहे. (CSK Team Bus Video Viral On Social Media Take A Look)

सीएसकेने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “जेव्हा तुमच्याकडे डिजे असतो, तेव्हा सेलिब्रेशन मोड असतोच.”

https://twitter.com/ChennaiIPL/status/1449276402801332236?s=20

या व्हिडिओला आतापर्यंत ९७ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच २३ हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि ४ हजारांपेक्षा अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

या सामन्यात केकेआरचा कर्णधार ऑयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेकडून डू प्लेसिसने शानदार ८६ धावांची खेळी करत सात चौकार आणि तीन षटकार लागावले. त्याला ऋतुराज गायकवाड (३२), रॉबिन उथप्पा(३१) आणि मोईन अली (३७*) यांची चांगली साथ लाभली. त्यामुळे सीएसकेने २० षटकांत १९२ धावांची मोठी मजल मारली.

त्यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या केकेआरला १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या. केकेआरकडून केवळ शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने अर्धशतके करत झुंज दिली. मात्र, अन्य कोणतेच फलंदाज फार काही करु शकले नाही. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने उत्तम गोलंदाजी करताना ३८ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. त्यामुळे चेन्नईने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

संबंधित बातम्या-

-‘माही’ची खिलाडूवृत्ती! पराभवानं निराश झालेल्या मॉर्गनला धोनीनं दिलं प्रोत्साहन, पाहा व्हिडिओ

-सोने पे सुहागा! आधी जेतेपदाचा जल्लोष अन् नंतर शार्दूल ठाकूरच्या बर्थडेचं सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल

-अंबाती रायुडूने झेल घेऊनही गिल ठरला होता नाबाद; कसं ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘हा’ व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---