पुणे| आयपीएल 2018 मध्ये पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे सामने होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आयपीएलचे सामने प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळणार आहे.
येत्या रविवारी, 20 एप्रिलला चेन्नईचा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध पुण्यात होणार आहे.त्यासाठी चेन्नईचा संघ पुण्यात दाखल झाला आहे.
त्याचे फोटो चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर अकांऊटवरून शेयर करण्यात आले आहेत. या फोटोंमधून चेन्नई संघाचे पुण्यात जंगी स्वागत झाल्याचे दिसून येत आहे.
'Don't miss Chennai Dhoni, whole of India is yours!'
'Chinna Thala, we love you! 💛'
Warmest of welcomes at the Den away from Den! #Yellove #WhistlePodu 💛🦁 pic.twitter.com/JOuQJXR3L7— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 16, 2018
#Yellove Surprise in Pune! #PrideOnWheels #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/nzWrJQy5lV
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 16, 2018
Csk arrived in Pune, plenty of support here for the team pic.twitter.com/ZzCaR2Bigc
— Mike Hussey (@mhussey393) April 16, 2018
Enroute pune ✈️@SPFleming7 pic.twitter.com/HjJvlqFE8V
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 16, 2018
तमिळनाडूध्ये कावेरी पाणी प्रश्न पेटला आहे. तसेच 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षकांवर कावेरी आंदोलकांनी बुटे फेकली होती.
ही बुटे चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिसच्या दिशेने आली. ही घटना कोलकाता संघाची फलंदाजी चालू असताना ८ व्या षटकात घडली. जडेजा क्षेत्ररक्षणासाठी लॉन्गऑनला उभा असताना त्याच्या दिशेने बूट आला. तसेच बाउंड्रीच्या दोरीच्या इथे आलेला बूट फाफ डुप्लेसिस आणि लुंगी इंगिडीने चुकवला होता.
या घटनेनंतरच चेन्नईतील सामने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चेन्नई संघाचे घरचे पुढील सर्व सामने पुण्यात होणार आहे.