---Advertisement---

सीएसके रिलीज करणार हे 5 खेळाडू, यादीमध्ये टी20च्या सर्वात दमदार अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025 5:10 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 19व्या हंगामाची लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात होणार आहे. या वेळी ऑक्शन 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे आणि ही मिनी ऑक्शन असेल. त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व 10 संघांना आपल्या ‘रिलीज’ आणि ‘रिटेन’ खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. चेन्नई सुपर किंग्ज संघातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी पाच स्टार खेळाडूंना रिलीज करणार आहे.

अहवालात सांगितले आहे की एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ तीन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना रिलीज करणार आहे. या यादीत सध्या टी20 क्रिकेटमधील धडाकेबाज ऑलराउंडर सॅम करनचाही समावेश आहे. चेन्नईच्या रिलीज खेळाडूंच्या यादीत दीपक हुड्डा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि डेव्हॉन कॉन्वे या खेळाडूंचा समावेश आहे.

एमएस धोनी आयपीएल 2026 मध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की धोनी स्वतः ठरवेल की त्याला आयपीएलमधून कधी निवृत्त व्हायचे आहे. अहवालांनुसार, धोनी या हंगामातही खेळताना दिसू शकतो.

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघ सर्वात खालच्या स्थानावर राहिला होता. संघाने 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले, तर 10 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येच कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाला होता. त्यानंतर एमएस धोनीने संघाची धुरा सांभाळली होती. आता पाहावे लागेल की आगामी हंगामात गायकवाडच पुन्हा चेन्नईचा कर्णधार असणार की फ्रँचायझी एखाद्या नव्या खेळाडूकडे नेतृत्व सोपवेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---