शुक्रवारी (31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगला. या सामन्यात चेन्नईची सुरुवात खराब झाली. मात्र, पुणेकर ऋतुराज गायकवाड याने 92 धावांची खेळी करत संघाला 7 बाद 178 धावा उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याचवेळी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच वापरण्यात येणाऱ्या इम्पॅक्ट प्लेयर नियमाची अंमलबजावणी केली गेली. स्पर्धेत पहिला इम्पॅक्ट प्लेयर होण्याचा मान मुंबईकर तुषार देशपांडे याला मिळाला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर चेन्नईने तुफानी सुरुवात केली. इतर फलंदाज धावा बनवण्यासाठी अडखळत असताना ऋतुराजने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 50 चेंडूंवर 6 चौकार व 9 षटकारांचा पाऊस पाडला 92 धावा केल्या. धोनीने 14 धावांचे योगदान देत संघाला 178 पर्यंत पोहोचवले. चेन्नईचा डाव संपल्यानंतर गुजरात सुरू होण्यापूर्वी चेन्नईने आपल्या इम्पॅक्ट प्लेयरची घोषणा केली. फलंदाजीत केवळ 12 धावा केलेल्या अनुभवी अंबाती रायुडू याच्या जागी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याला संधी मिळाली. तर, गुजरातसाठी केन विलियम्सन याच्या जागी अष्टपैलू साई सुदर्शन या युवा फलंदाजाला संघात समाविष्ट केले गेले.
Say hello to the 1⃣st-ever Impact Player in the history of the IPL! 👋
@TusharD_96 is 🔛 the field, replacing Ambati Rayudu
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#TATAIPL | #GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/bkY7IF8Qpa
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
काय आहे नियम?
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेअर’ (Impact Player) नियम लागू असेल. म्हणजेच, संघ एका निश्चित काळादरम्यान सामन्यामध्ये आपल्या एका खेळाडूला बदलू शकतील. नाणेफेकीवेळी प्लेइंग इलेव्हनबरोबर कर्णधाराला 4 अशा खेळाडूंची नावे द्यावी लागतील, ज्यांपैकी एकाला तो सामन्यादरम्यान वापरू शकतो. या 4 पैकी फक्त एका खेळाडूला सब्स्टीट्यूट म्हणून वापरण्याचे बंधन आहे. जर संघ प्रथम फलंदाजी करताना झटपट आपल्या विकेट्स गमावत असेल, तर प्रभाव खेळाडू नियमाअंतर्गत ते प्लेइंग इलेव्हनमधील एखाद्या गोलंदाजाच्या (तळातील फलंदाज) जागी अतिरिक्त फलंदाज वापरू शकतात.
(CSK Tushar Deshpande Becomes IPL First Ever Impact Player In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023 । कर्णधार रोहितवर जोफ्रा आर्चर पडतोय भारी, नेट्समध्ये करतोय कहर गोलंदाजी
वयाच्या 32व्या वर्षीय इंग्लंडचा दिग्गज करतोय आयपीएल पदार्पण, पण सोप्पा नसेल मार्ग; वाचा सविस्तर