आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (13 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळला गेला. मोहली येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला. पुनरागमन करत असलेला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी गुजरात संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याला संधी दिली गेली. तब्बल तीन वर्षाच्या कालावधीनंतर तो आयपीएल खेळताना दिसला.
गुजरातने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल केले. कर्णधार हार्दिक पंड्या पुनरागमन करत असल्याने विजय शंकर याला बाहेर बसावे लागले. तर, युवा यश दयालच्या जागी अनुभवी मोहित शर्मा याला संधी मिळाली. एकेकाळी भारतीय संघाचा तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला मोहित मागील तीन वर्षापासून आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता.
आयपीएल 2020 मध्ये त्याने पंजाबविरुद्ध दिल्लीसाठी आपला अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो आयपीएल खेळताना दिसला नव्हता. मागील वर्षी गुजरातने त्याला नेट बोलर म्हणून संधी दिलेली. त्यानंतर यावेळी आयपीएल लिलावात बोली लावत त्याला संघात निवडले.
या पुनरागमनाच्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीची जुनी धार दाखवली. आपल्या 4 षटकात त्याने केवळ 18 धावा देत 2 बळी मिळवले.
मोहितने 2013 मध्ये चेन्नईसाठी खेळताना 23 बळी मिळवले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून 2014 टी20 विश्वचषक व 2015 वनडे विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, 2015 नंतर त्याला भारतीय संघाकडून खेळता आले नाही. 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना त्याने पर्पल कॅप जिंकण्याचा कारनामा केला होता. 2013 ते 2020 या कालावधीत त्याने आयपीएल खेळताना 86 सामन्यात 92 धावा केल्या.
(CSK Veteran Pacer Mohit Sharma Makes Comeback In IPL After 935 Days For Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स, नाशिक द्वारका डिफेंडर्स संघ प्रमोशन फेरीसाठी पात्र
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय