---Advertisement---

फलंदाजीत खराब कामगिरी करूनही धोनीचे होत आहे कौतुक, पाहा कारण

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 3:58 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तीन आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. याबरोबरच अनेकदा त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळेही त्याने कौतुक होत असते. नुकते आयपीएल २०२०मध्ये देखील त्याने दाखविलेल्या खेळभावनेमुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

काल (25 सप्टेंबर) एसएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाशी झाला. या सामन्यादरम्यान दिल्ली संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉच्या डोळ्यात कचरा गेला होता त्यामुळे यष्टीरक्षक धोनीने त्याच्या डोळ्यातील कचरा काढून देण्यात मदत केली.

या घटनेदरम्यानचा फोटो आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून त्याबरोबर धोनीच्या खिलाडूवृत्तीचे कौतुकही होत आहे.

 

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला पण त्यानंतरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच काल झालेल्या तिसऱ्या सामन्यातही चेन्नईला दिल्ली कॅपिटल्स संघाने पराभूत केले. या तिन्ही सामन्यात धोनीला फलंदाजीत चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. त्याने 3 सामन्यात 44 धावाच केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---