---Advertisement---

IPL 2020: कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 9:20 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला 10 धावांनी पराभूत केले. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सर्वबाद 167 धावा केल्या होत्या आणि चेन्नईला 168 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 5 बाद 157 धावाच करता आल्या. या सामन्यादरम्यान घडलेल्या काही खास गोष्टींवर आपण नजर टाकू.

• या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज राहुल त्रिपाठीने आयपीएल कारकिर्दीतले पाचवे अर्धशतक झळकावले

• चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमध्ये 150 बळी पूर्ण केले आहेत. यासह ड्वेन ब्राव्हो लसिथ मलिंगा, अमित मिश्रा, पियुष चावला आणि हरभजन सिंग यांच्यानंतर 150 बळी घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

• या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 23 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 14 सामने चेन्नईने जिंकले होते, तर कोलकाताने चेन्नईविरुद्ध आतापर्यंत 8 विजय मिळवले होते. तथापि, हा सामना जिंकल्यानंतर कोलकाताने आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध 9 वा विजय नोंदविला.

• या सामन्यात चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माने आयपीएल 2020 मध्ये पहिला बळी घेतला. या सामन्यात कर्णने एकूण 2 बळी घेतले

• आयपीएल 2020 चा हा चौथा सामना होता ज्यामध्ये कोणताही एक संघ सर्वबाद झाला. या हंगामात कोलकाताच्या आधी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादसह हे संघ सर्वबाद झाले होते.

• आयपीएल 2020 मध्ये चेन्नईचा अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिसने आतापर्यंत 299 धावा केल्या आहेत. यासह, फाफ या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज केएल राहुलपासून अवघ्या 3 धावांच्या अंतराने मागे आहे. राहुलच्या 302 धावा आहेत.

• चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनने या सामन्यात अर्धशतक झळकावत आयपीएलमध्ये आपले 21 वे अर्धशतक ठोकले आहे.

• कोलकाताचा अनुभवी फिरकीपटूं सुनील नरेनने शेन वॉटसनला आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाद केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---