सर्वात श्रीमंत लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून यूएई येथे सुरु होत आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. दोन्ही संघ तयारीत व्यस्त आहेत. सीएसके आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ आहेत. धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार आणि कॅप्टन कुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने तीन विजेतेपद जिंकले आहेत.
या लीगमध्ये खेळाडूंना फ्रेंचाइजीकडून बक्कळ पैसा मिळतो. प्रत्येक संघ स्टार खेळाडूंना त्यांच्या संघात घेण्यास उत्सुक असतो. एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे दोघेही त्यांच्या संघात सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू आहेत.
सीएसकेच्या स्टार क्रिकेटपटूंचा एका हंगामाचा पगार:
आयपीएलमध्ये धोनी आणि रोहितचा पगार 15-15 कोटी आहे. फिरकीपटू रवींद्र जडेजाला 7 कोटी रुपये, फलंदाज केदार जाधव याला 7.8 कोटी रुपये, अष्टपैलू ड्वेन ब्राव्होला 6.4 कोटी रुपये आणि दिग्गज फलंदाज शेन वॉटसनला पगार म्हणून 4 कोटी रुपये मिळतात. आयपीएल 2020 मधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाचा पगार 11 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर अनुभवी फिरकीपटू हरभजनसिंगचा पगार 2 कोटी आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरचा पगार मात्र कमी आहे. त्याला सध्या 80 लाख रुपये मिळतात.फिरकीपटू कर्ण शर्माचा पगार थोडा जास्त असून त्याला सीएसकेकडून पाच कोटी रुपये मिळतात.
मुंबई इंडियन्सच्या स्टार क्रिकेटपटुंचा एका हंगामाचा पगार:
हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक पंड्याचा पगार 11 कोटी रुपये आहे, तर कृणाल पंड्याला 8.8 कोटी रुपये मिळतात. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा पगार 7 कोटी रुपये आहे, तर युवा फलंदाज ईशान किशनला 6.2 कोटी रुपये मिळतात. संघातील सर्वात यशस्वी परदेशी खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरान पोलार्डला पगाराच्या रुपात 5.4 कोटी रुपये मिळतात. दुसरीकडे संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला 3.2 कोटी रुपये मिळतात. 2020 आयपीएलमधून माघार घेतलेल्या गोलंदाज लसिथ मलिंगाचा पगार 2 कोटी रुपये आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ:
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसीस, इमरान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एंगेडी, मिशेल सँटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतूराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम करन, पियुष चावला, जोश हेजलवुड, आर साई किशोर.
मुंबई इंडियन्स संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कायरान पोलार्ड, राहुल चहर , ख्रिस लिन, हार्दिक पंड्या, शेरफन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंग, मोहसिन खान, मिचेल मॅक्लेनघन, प्रिन्स बलवंत राय, सुचित रॉय, ईशान किशन.