इंडियन प्रीमियर लीगमध्ये नेहमीच चाहत्यांचा एकापेक्षा एक षटकार पाहायला मिळाले आहेत. शनिवारी (20 मे) आयपीएलम 2023चा 67 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. सीएसकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेचा सलामीवीर फलंदाज डिवॉन कॉनवे याने आयपीएल 2023 मधील महत्वाचा षटकार मारला.
चेन्नई सुपर किंग्ज यावर्षी पुन्हा एकदा आयपीएल प्लेऑफसाठी शर्यतीत आहे. शनिवारचा सामना जिंकल्यानंतर सीएसकेचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के मानता येईल. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके संग विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरला. दिल्लीच्या अरुण जेटला स्टेडियमवर सीएसकेचे नियमित सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डिवॉन कॉनवे डावाची सुरुवात करण्यासाठी आले. डावातील दुसऱ्या षटकात डिवॉन कॉनवेने सीएसकेसाठी पहिला षटकार मारला, जो चालू हंगामातील 1000वा षटकार ठरला.
1000 sixes in IPL 2023. pic.twitter.com/XRwYgnLDxw
— Johns. (@CricCrazyJohns) May 20, 2023
यावर्षीच्या 1000 आयपीएल षटकारांमध्ये सर्वात मोठे योगदान फाफ डू प्लेसिस याच्या नावावर आहे. फाफने चालू आयपीएल हंगामात आरसीबीसाठी पहिल्या 13 सामन्यांमध्ये सर्वाधिक 36 षटकार मारले असून सर्वाधिक 702 धावा केल्या आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबे आहे. दुबेने शनिवारी हंगामातील आपले 30 षटकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने आतापर्यंत 30 षटकार मारले आहेत. (CSK vs RCB 1,000 sixes completed in IPL 2023.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
DCvCSK: अखेरच्या साखळी सामन्यात सीएसकेची प्रथम फलंदाजी, दिल्ली विजयी समारोपासाठी सज्ज
IPLमधील वाद थांबेना! एकमेकांना भिडले हेटमायर अन् करन, पंजाब-राजस्थान लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर पंगा