---Advertisement---

विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 5:01 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या 52 चेंडूत नाबाद 90 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आरसीबीने शनिवारी (10 ऑक्टोबर) आयपीएलध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 37 धावांनी पराभूत केले. कोहलीने आपल्या खेळीदरम्यान चार चौकार आणि चार षटकार लगावले. त्याने दुसर्‍या विकेटसाठी सलामीवीर देवदत्त पडिक्कल (34 चेंडूत 33 धावा, 2 चौकार आणि 1 षटकार) याच्यासह 53 धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबे (नाबाद २२) याच्यासह पाचव्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची भागीदारी केली. पराभवानंतर कोहलीने धोनीची गळाभेट घेतली. चाहत्यांना हे दृश्य खूप आवडले.

कोहलीच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने सन्मानजनक धावसंख्या गाठली. विजयानंतर किंग कोहलीने सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याची गळाभेट घेतली. कोहली नेहमीच धोनीचा आदर करतो. त्याने बर्‍याच वेळा असे म्हटले आहे की धोनी त्याचा कर्णधार आहे आणि कायमच राहील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कोहली पहिल्यांदाच धोनीला भेटला.

धोनी आणि कोहलीचे हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. कोहलीने धोनीला केलेली गळाभेट पाहून चाहते खूप आनंदित आहेत. आरसीबीने एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकले नाही, अशा परिस्थितीत कोहली आणि त्याचा संघ या हंगामात जोरदार तयारीसह उतरला आहे. सीएसकेला पराभूत केल्यानंतर आरसीबी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आला आहे. सीएसके सहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2020 मध्ये दिल्लीची कॅपिटल्स संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आरसीबीने चार बाद 169 धावा केल्या, ज्याला उत्तर देताना चेन्नई सुपर किंग्ज संघ 20 षटकांत आठ बाद 132 धावा करू शकला. कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन 

-महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी

-…आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली

ट्रेंडिंग लेख-

-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज

-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---