सनरायझर्स हैदराबादने अखेर आयपीएलच्या 18व्या हंगामात तिसरा विजय मिळवला. 25 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने 19.5 षटकांत सर्वबाद 154 धावा केल्या, तर सनरायझर्स हैदराबादने ईशान किशन आणि कामेंदु मेंडिस यांच्या खेळीच्या जोरावर 18.4 षटकांत सामना जिंकला.
पहिल्या डावात खेळताना डेवाॅल्ड ब्रेव्हिसने सीएसकेसाठी सर्वाधिक धावा केल्या, त्याने 25 चेंडूत 42 धावा केल्या. त्याच्या या खेळीने सीएसकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. 170+ च्या स्टाईक रेटने फलंदाजी करत असलेल्या ब्रेविसला हर्षल पटेलने झेलबाद केले. कमिंदू मेंडिसने अप्रतिम झेल घेतला. सामन्याच्या दृष्टीने ब्रेव्हिसची विकेट टर्निंग पाँईंट ठरली. यानंतर सीएसकेने सात्याने विकेट गमावत राहिल्याने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचता आले नाही. शेवटी संघाने 20 षटकात 154 धावा केल्या.
Only a catch like that could’ve stopped that cameo from Brevis! 🤯
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Kamindu Mendis, take a bow 🙇#CSK 119/6 after 14 overs.
Updates ▶ https://t.co/26D3UalRQi#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/NvthsQfpUj
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 155 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. ट्रॅव्हिस हेड (19) आणि ईशान किशनने दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. हेन्रिक क्लासेन फक्त 7 धावा करून बाद झाला. 54 धावांपर्यंत हैदराबादने तीन विकेट गमावले होते. ईशान किशनने 34 चेंडूंमध्ये 44 धावा करत डाव सावरला. 106 वर पाच विकेट गेल्यावर कामेंदु मेंडिस (32) आणि नितीश रेड्डी (19) यांनी विजय मिळवून दिला. हैदराबादने 18.4 षटकांत पाच गडी राखून सामना जिंकला. सीएसकेसाठी नूर अहमदने 2, तर खलील अहमद, रवींद्र जडेजा आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
A milestone victory 👏#SRH register their first ever win at Chepauk with a strong performance against #CSK 🔝💪
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Scorecard ▶ https://t.co/26D3UampFQ#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/lqeX4CiWHP