इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील ३५ व्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ शारजाहमध्ये आमने सामने आले आहेत. नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने बेंगलोर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत बेंगलोरने निर्धारित २० षटकांनंतर ६ गडी गमावत १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने फलंदाजीतील सांघित प्रदर्शनामुळे १८.१ षटकातच ६ विकेट्स राखून सामना जिंकला.
बेंगलोरच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसची सलामी भागिदारी ७१ धावांवर तुटली. युझवेंद्र चहलने ३८ धावांवर ऋतुराजला विराट कोहलीच्या हातून झेलबाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. त्यानंतर फाफही ३१ धावांवर झेलबाद झाला. पुढे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायुडूने काही आकर्षक शॉट खेळत ३२ धावांचे योगदान दिले. तर मोईन अलीनेही २३ धावा केल्या.
अंतिम षटकात एमएस धोनी (नाबाद ११ धावा) आणि सुरेश रैना (१७ धावा) यांनी मोर्चा सांभाळत संघाला गोड शेवट करुन दिला. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी बेंगलोरकडून सलामीला फलंदाजी करताना देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट कोहली यांनी झंझावती खेळी केली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्यांनी १३ व्या षटकांपर्यंत आपापले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीच्या रुपात ड्वेन ब्रावोने संघाला पहिला धक्का दिला. ५३ धावांवर खेळत असलेल्या कोहलीला त्याने १३.२ षटकात रविंद्र जडेजाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर लगेचच एबी डिविलियर्स १२ धावा करुन शार्दुल ठाकूरची शिकार बनला. त्यापुढील चेंडूवर त्याने ७० धावांवर खेळत असलेल्या पडीक्कललाही बाद केले.
पुढे ग्लेन मॅक्सवेलव्यतिरिक्त कोणालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. परिणामी बेंगलोरने २० षटकांनंतर १५६ धावा फलकावर लावल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने २ आणि दिपक चाहरने एका विकेटचे योगदान दिले.
कोहली अन् पडीक्कलचे दणकेबाज अर्धशतक
प्रथम नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने गोलंदाजी निवडली असून बेंगलोरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजीचे आमंत्रण स्विकारत बेंगलोरच्या सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट कोहली यांनी जोरदार फटकेबाजी केली. १३ व्या षटकापर्यंत दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले असून संघाच्या धावाही शंभरीपार गेल्या आहेत.
पड्डीकलने १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. तर कोहलीनेही १२.१ षटकात चौकारासह धावांनी पन्नाशी गाठली. मात्र त्यापुढील षटकात दुसऱ्या चेंडूवर ड्वेन ब्रावोने रविंद्र जडेजाच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे ५३ धावांवर त्याला पव्हेलियनला परतावे लागले. तर बेंगलोर संघाला १११ धावांवर पहिला धक्का बसला. कोहलीनंतर एबी डिविलियर्स फलंदाजीसाठी आला आहे.
.@RCBTweets captain leading from the front! ???? ????@imVkohli brings up his 4⃣1⃣st IPL half-century. ???? ???? #VIVOIPL #RCBvCSK
Follow the match ???? https://t.co/2ivCYOWCBI pic.twitter.com/bvgXjw19Rn
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2021
5⃣0⃣ up for @devdpd07 ????
1⃣0⃣0⃣ up for @RCBTweets ????#RCB are on a roll here in Sharjah! ???? ???? #VIVOIPL #RCBvCSKFollow the match ???? https://t.co/2ivCYOWCBI pic.twitter.com/LHtysAacgR
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2021
नाणेफेक जिंकून धोनीने निवडली गोलंदाजी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील ३५ व्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ शारजाहमध्ये आमने सामने आले आहेत. उभय संघांच्या कर्णधारांमध्ये ७ वाजता नाणेफेक होणार होती. मात्र अचानक शारजाहच्या मैदानात आलेल्या वादळामुळे नाणेफेकीस उशीर झाला. अखेर ७.३५ च्या आसपास नाणेफेक झाली असून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Toss News:@msdhoni has won the toss & @ChennaiIPL have elected to bowl against the @imVkohli-led @RCBTweets. #VIVOIPL #RCBvCSK
Follow the match ???? https://t.co/2ivCYOWCBI pic.twitter.com/v3dmMlajnX
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, टीम डेविड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड
The wait continues ⌛️
Toss delayed further.
Next inspection at 5:55 PM (Local Time) & 07.25 PM IST. #VIVOIPL #RCBvCSK pic.twitter.com/6KXEFoZitu
— IndianPremierLeague (@IPL) September 24, 2021






