---Advertisement---

पाच पराभवानंतरही CSK च्या प्लेऑफच्या आशा कायम, जाणून घ्या संपूर्ण गणित!

On: शनिवार, एप्रिल 12, 2025 1:34 PM
---Advertisement---

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल 2025 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट्सने मात दिली. चेन्नईचा या हंगामातील हा सलग पाचवा पराभव आहे. तरीसुद्धा चेन्नई आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफ मध्ये स्थान मिळू शकते, पण चेन्नईसाठी प्लेऑफ मध्ये जाण्याचा मार्ग खूप कठीण असणार आहे.

चेन्नईने या हंगामात 6 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये फक्त एक विजय मिळवला आहे. याप्रकारे संघाकडे फक्त 2 पॉईंट आहेत. चेन्नईचा नेट रन रेट -1.554 आहे. जर त्यांना इथून पुढे प्लेऑफ मध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील. याच बरोबर दुसऱ्या संघाचा विजय आणि पराभव हे सुद्धा यावर निर्भर करेल.

चेन्नई संघाचे या हंगामात अजून 8 सामने बाकी आहेत. जर संघाने 7 सामने जिंकले, तर त्यांना 14 पॉईंट्स मिळतील आणि आत्ताच्या एका विजयाचे 2 पॉईंट्स भेटलेच आहेत. या प्रकारे त्यांचे 16 पॉईंट्स होतील. प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी एवढे पॉईंट गरजेचे असतात.

चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये सध्या 9व्या स्थानावर आहे. त्याचं रन रेट रन सुद्धा खूप खराब आहे. चेन्नईला राहिलेले सामने खूप मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, यामुळे नेट रन रेट मध्ये सुधार होईल. हे प्लेऑफसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते.

चेन्नईचे या हंगामात अजून 8 सामने शिल्लक आहेत. त्यांचा पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे, हा सामना 14 एप्रिल रोजी खेळला जाईल. यानंतर चेन्नईची पुन्हा मुंबई इंडियन्स सोबत टक्कर होईल. चेन्नई विरुद्ध मुंबई सामना 20 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. तसेच त्यांचा शेवटचा सामना गुजरात टायटन्स संघाशी होईल, गुजरात आणि चेन्नई सामना 18 मे रोजी अहमदाबाद मध्ये खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---