इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मधील ४७ वा सामना अबूधाबी येथील शेख झायद स्टेडियमवर पार पडेल. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला व प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या पहिला संघ चेन्नई सुपर किंग्स व गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स हे संघ या सामन्यात भिडतील. या विजयासह चेन्नई पहिल्या दोनमधील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, राजस्थानला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी इथून पुढील प्रत्येक सामना जिंकण्याची गरज आहे. तत्पूर्वी, आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या ड्रीम ११ चा अंदाज घेऊन आलो आहोत.
चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, सॅम करन, जोश हेजलवूड, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.
राजस्थानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
यशस्वी जयस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (कर्णधार) लियाम लिव्हींगस्टोन, महिपाल लोमरोर, अनुज रावत, श्रेयस गोपाल, मुस्तफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया व तबरेज शम्सी.
महाची ड्रीम इलेव्हन-
संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, एविन लुईस, अंबाती रायुडू
सॅम करन, रविंद्र जडेजा (अष्टपैलू)
जोश हेजलवूड, मुस्तफिझुर रहमान, चेतन सकारिया, दीपक चहर