भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तो विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधीच इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेस्टोने आपल्या धमाकेदार प्रदर्शनाने भारतीय गोटात चिंता वाढवली आहे
इंग्लंड संघाला नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध १-० ने कसोटी मालिका गमवावी लागली. या मालिकेत जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चरसारखे प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते. आता इंग्लंडला भारताविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंडसाठी आनंदाची बातमी म्हणजे बऱ्याच काळानंतर जॉनी बेयरस्टो जबरदस्त लयीत दिसत आहे. टी२० ब्लास्ट स्पर्धेत त्याने लागोपाठ तिसऱ्या सामन्यात खेळताना ५० पेक्षा अधिक धावा केल्या. यॉर्कशायर संघाकडून खेळताना त्याने वॉरसेस्टशायरविरुद्ध ५१ चेंडूत ११२ धावांची जबरदस्त खेळी केली. याआधी बेयरस्टोने लिस्टशायर संघाविरुद्ध ८२ धावा तर डरहम संघाविरुद्ध खेळतांना ६७ धावा केल्या होत्या.
लागोपाठ 2 सामन्यांत यॉर्कशायर विजयी-
वॉरसेस्टशायरविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करीत यॉर्कशायर संघाने निर्धारित २० षटकांत २१६ धावा केल्या. यॉर्कशायरची सुरवात चांगली झाली नव्हती. त्यांचे पहिले दोन खेळाडू १० धावांवरच बाद झाले होते. त्यानंतर बेयरस्टोने टॉम कोल्हर कॅडमोरसोबत तिसऱ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. बेयरस्टोने ५२ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११२ धावांची तुफानी खेळी केली. टी२० क्रिकेटमधील हे त्याचे तिसरे शतक होते.
कोल्हरने देखील ३३ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने १२ चेंडूत २२धावा जोडून संघाला २०० चा आकडा गाठून दिला. वॉरसेस्टशायर तर्फे गोलंदाज बेन द्वारशुईसने ४ षटकात ३१ धावा देऊन ४ बळी टिपले.
त्याला प्रत्युत्तर द्यायला मैदानात उतरलेला वॉरसेस्टशायर संघाची सुरवात निराशाजनक झाली. डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर डेव्हिड विलीने ब्रेट ओलीविराची यष्टी उडवली. रिकी वेसल्स (३२) आणि कर्णधार मोईन अली(३९) यांनी थोडा संघर्ष केला. पंरतु वॉरसेस्टशायरचा संघ १६.३ षटकांतच गारद झाला. यॉर्कशायरच्या आदिल राशिदने ३२ धावा तीन बळी टिपले तर डेव्हिड विली आणि डॉम बेस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. यॉर्कशायरने हा सामना तब्बल ९४ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा क्रिकेटपटू बुमराहची बायकोच आली त्याची मुलाखत घ्यायला, पुढे झाले असे काही की
–जडेजाला अंतिम ११मध्ये संधी दिलीच पाहिजे,माजी खेळाडूने जडेजावर व्यक्त केला विश्वास
–कारकिर्दीदरम्यान होणाऱ्या टीकांना कसा सामोरा जातोस? अजिंक्य रहाणेने दिले मन जिंकणारे उत्तर