टी२० क्रिकेटच्या आगमनाने गोलंदाजांवर कर्दनकाळ काळ आला आहे, असा समज मागील अनेक वर्षांत क्रिकेट वर्तुळात विकसित झाला आहे. फलंदाजीला पोषक खेळपट्टी व कमी अंतरावर असलेल्या सीमारेषेमुळे गोलंदाज अतिरिक्त धावा देतात असे मानले जात आहे. मात्र, या सर्व चर्चेला निरर्थक ठरवत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या जास्त धावा बनवण्याला गोलंदाजांनाच जबाबदार धरले आहे. वॉर्नच्या मते, गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम बनण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव जाणवत आहे.
शेन वॉर्नने ट्विटरवर रोकठोक मत मांडले आहे. त्याने म्हटले की, “टी२० मध्ये गोलंदाज फार लवकर गुडघे टेकत आहेत. थोड्याशा कठीण परिस्थितीत देखील ते हताश होऊन आपण उत्तम कामगिरी करू शकणार नाही असे मानून प्रयत्न करायचे सोडून देतात. फलंदाजांमध्ये सर्वोत्तम बनण्याची इच्छाशक्ती असते व त्यासाठी ते उत्तम सराव करतात मात्र गोलंदाजांमध्ये ती इच्छाशक्ती जाणवत नाही.”
https://twitter.com/ShaneWarne/status/1338466998473244672
वॉर्नने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “वेगवान गोलंदाज सराव सत्रात ३० ते ४० यॉर्करचा सराव करतात का? की खेळाचे विज्ञानामुळे गोलंदाजांचा सराव होत नाहिये?”
https://twitter.com/ShaneWarne/status/1338448142916677632
वॉर्न हे देखील म्हटले आहे की, कोणत्याही खेळाडूचा मैदानात एखादा वाईट दिवस येऊ शकतो. मात्र, हार न मानता सर्वोत्तम बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते, असेही तो म्हणाला.
सध्याच्या काळात संघ टी२० क्रिकेटमध्येही २०० धावांचा आकडा पार करत आहेत. तरीही, सीमारेषा लहान झाली आहे आणि पहिल्या सहा षटकात क्षेत्ररक्षणावरही निर्बंध असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्याची संपूर्ण माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर
नववर्षात वेस्ट इंडिज करणार बांगलादेशचा दौरा, ‘या’ कारणामुळे टी२० मालिका रद्द
“बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली स्तुती






