मुंबई | भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी सध्या कारकिर्दीतील सर्वात खराब फाॅर्ममधून जात आहे. त्यामुळे २०१८मध्ये या खेळाडूवर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे.
त्यातच धोनीला टी२० संघातून वगळल्यामुळे टीकेची धार आणखी कडक झाली आहे. सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध विंडीज मालिकेत धोनीने ३ सामन्यात १६.६७च्या सरासरीने ५० धावा केल्या आहेत.
यावर्षी खेळलेल्या १९ सामन्यात धोनीने २५च्या सरासरीने जेमतेम २७५ धावा केल्या आहेत. याचमुळे धोनीच्या २०१९ विश्वचषकामधील समावेशाबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
असे असले तरी जाणकारांच्या मते धोनी २०१९च्या विश्वचषकात नक्की खेळेल. त्याचप्रमाणे निवड समितीने रिषभ पंतला वन-डे संघात संधी देऊन धोनीला एकप्रकारे इशारा दिला आहे.
अशीच काहीशी अवस्था काही वर्षांपुर्वी टीम इंडियाचा त्यावेळी सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीची झाली होती. गांगलीला २००६मध्ये भारताकडून विशेष असे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
तेव्हा टीम इंडियाने खेळलेल्या १२ पैकी ४ कसोटीत तर ३०पैकी एकाही वन-डे गांगुलीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर २००७ला जबरदस्त पुनरागमन करत त्याने संघात स्थान मिळवले होते.
त्याकाळी गांगुलीची एक खास जाहिरात आली होती. त्यात तो प्रेक्षकांना “अपने दादा को भुले तो नहीं” असे विचारताना दिसत होता. पेप्सी या शितपेयाच्या कंपनीसाठी ती जाहिरात बनवली होती. आता तीच जाहिरात पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन गांगुलीच्या बाबतीतही असेच होत असल्याचे चाहते तसेच विरोधकांचे मतं आहे.
सध्या धोनी ज्याप्रकारे खेळत आहे ते पाहुन आम्हाला जून्या काळातील गांगुलीची आठवण येत असल्याचेही काही चाहत्यांचे म्हणणे आहे.
https://twitter.com/AsliVikrant/status/1056480629519396865
महत्त्वाच्या बातम्या-
–उद्यापासून सिन्नर-नाशिक येथे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डीचा थरार!
–क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल
–विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की
–अशी कामगिरी करणारा रोहित ठरला जगातील पहिलाच फलंदाज