भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यावर सिमाशुल्क विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार कस्टम विभागाने हार्दिक पांड्याला विमानतळावर अडवून नियमांप्रमाणे चौकशी वजा तपासणी केली असता, त्याच्याजवळून तब्बल 5 कोटींच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
हार्दिक पांड्या विदेशाहून स्वदेशी परत आला असताना विमानतळावरच त्यावर ही कारवाई करण्यात आली. हार्दिक विमानतळावर आला असता सिमाशुल्क विभागाने त्याच्याजवळील वस्तूंची चौकशी, तपासणी केली. त्यावेळी त्याच्याजवळ दोन किमती घड्याळे होती. ज्यांची अंदाजे किंमत ५ कोटी इतकी आहे. हार्दिक या घड्याळांची खरेदी बिले अधिकाऱ्यांना दाखवू शकला नाही. अखेरीस कागदपत्रे सादर न करता आल्याने अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून ही दोन्ही घड्याळे जप्त केली.
https://www.instagram.com/p/CVF1zRdF_wT/?utm_source=ig_web_copy_link
सुरुवातीला अगदी गरीबीत दिवस काढलेला हार्दिक पांड्या आज स्वकौशल्याने भारताचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू बनला आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो. मागील काही वर्षात त्याने प्रगतीची अनेक शिखरे ओलांडली आहेत. आज हार्दिककडे कोट्यवधींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्याला अनेक महागड्या चीजवस्तू खरेदीची आवड असल्याचेही जगजाहीर आहे.
https://www.instagram.com/p/CQDZGworBrt/?utm_source=ig_web_copy_link
नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात हार्दिकची कामगिरी ही सुमार राहिली होती. अगोदर दुखापत अन् त्यानंतर खराब प्रदर्शनामुळे तो टीकेचा धनी बनलाय.
अधिक वाचा –
काय सांगता! द्रविडच्या मुलाचा गांगुलीला एक फोन कॉल अन् ‘द वॉल’ बनला टीम इंडियाचा महागुरू