वनडे विश्वचषक 2023च्या 44व्या सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान संघ आमने सामने आहेत. पाकिस्तला या सामन्यात नाणेफेक जिंकता आली नसून उपांत्य सामन्याच्या स्पर्धेतून पाकिस्तान जवळपास बाहेर पडला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा ग्रुप स्टेजमधील हा अंतिम सामना आहे. उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून इंग्लंड संघ आधीच बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची शेवटची आशा शनिवार (11 नोव्हेंबर) होत असलेल्या या सामन्यावर कायम होत्या. मात्र, यासाठी पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करणे आवश्यक होते, जेणेकरून संघ उपांत्य फेरीत कसाबसा पोहोचू शकत होता. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानच्या आशा मावळल्या आहेत.
Pakistan scenario now:
If England score 50, chase in 2 overs.
If England score 100, chase in 2.5 overs.
If England score 200, chase in 4.3 overs.
If England score 300, chase in 6.1 overs. pic.twitter.com/Fhue0EZJC9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2023
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला ता पाकिस्तानला 50 धावांचे लक्ष्य अवघ्या 2 षटकात गाठावे लागणार आहे. तर संघाला 100 धावांचे लक्ष्य मिळाले, तर 2.5 षटकात विजय मिळवता आला पाहिजे. तसेच 200 धावांचे लक्ष्य असल्यास 4.3 षटकात पाकिस्तान संघ जिंकला पाहिजे. अशात उपांत्य सामन्याचे स्वप्न पाकिस्तानसाटी स्वप्नच राहणार, असे दिसते. (CWC 2023 । England opted to Bat First against Pakistan in Eden Gardens)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आगा सलमान, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
पराभव होऊनही अफगाणिस्तानने घडवला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ
अनुष्काने विचारलं 150 च्या स्पीडचा बाउन्सर की यॉर्कर, कशाची भीती वाटते? ,पाहा विराटने काय दिलं उत्तर