वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना सुरू झाला. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 282 धावांवर रोखले. इंग्लंडसाठी जो रूट याने सर्वाधिक 77 धावा बनवल्या.
नियमित कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या न्यूझीलंड संघासाठी सुरुवात चांगली झाली नव्हती. जॉनी बेअरस्टो व डेव्हिड मलान यांनी आक्रमक सुरुवात दिली. मात्र, मॅट हेन्रीने मलान व सॅंटनरने जॉनीला बाद केले. हॅरी ब्रुक याने आक्रमक सुरुवात केली मात्र तो 25 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मोईन अलीदेखील फारसे योगदान देऊ शकला नाही. त्यामुळे इंग्लंडची अवस्था एक वेळ 4 बाद 118 अशी झालेली.
या खराब स्थितीतून इंग्लंडला कर्णधार जोस बटलर व जो रूट यांनी 70 धावांची भागीदारी करत बाहेर काढले. बटलरने 43 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले. जो रूटने 77 धावा केल्या. अखेर इंग्लंडचा डाव 282 धावांवर मर्यादित राहिला.
न्यूझीलंड संघासाठी मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर फिरकीपटू मिचेल सॅंटनर व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले. रचिन रवींद्र व ट्रेंट बोल्ट यांनी देखील प्रत्येकी एक बळी मिळवला.
(CWC 2023 Newzealand Restrict England On 282 In World Cup Opener)
हेही वाचा-
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’