वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. अशात एकीकडे ऑस्ट्रेलिया आपल्या विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे नेदरलँड्स संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आणखी एक मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न करेल. अशात या सामन्यापूर्वी नेदरलँड्सचा स्टार खेळाडू लोगन व्हॅन बीक याने मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला व्हॅन बीक?
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भिडण्यापूर्वी लोगन व्हॅन बीक (Logan Van Beek) याने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, “आम्ही इथे उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी आलो आहोत. हेच आमचे लक्ष्य आहे. हे आमच्या तयारीपासूनच स्पष्ट होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने आमच्यात आणखी आत्मविश्वास भरला आहे. आम्ही आमच्या जोरावर कोणत्याही चांगल्या संघाला पराभूत करू शकतो.”
पुढे बोलताना व्हॅन बीक म्हणाला, “आमच्या तयारीत जे सातत्य राहिले आहे, तेच आमच्या यशाचे रहस्य आहे. त्यामुळे आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की, आम्ही कोणाविरुद्ध खेळायला जात आहोत. आम्ही प्रत्येक संंघाविरुद्ध एकाच प्रकारची तयारी करतो, मग समोर ऑस्ट्रेलिया असो किंवा ओमान. आमच्या तयारीची पूर्ण प्रक्रिया बिल्कुल एकसारखी आहे.”
नेदरलँड्सच्या स्टार खेळाडूच्या या वक्तव्याने स्पष्ट आहे की, ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण तयारीने उतरतील. नेदरलँड्स संघ या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेप्रमाणे मोठा उलटफेर करण्याच्या प्रयत्नात आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. या सामन्यात एकेवेळी नेदरलँड्स संघ 6 बाद 110 धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याच्या 78 धावांच्या जोरावर संघाने 245 धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजीतही नेदरलँड्स संघाने कमाल करत दक्षिण आफ्रिकेला 207 धावांवर सर्वबाद केले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात काय होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (cwc 2023 player logan van beek feels netherlands capable upsetting australia said this read more)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला नमवत नेदरलँड्स करणार का उलटफेर? ‘या’ संघाचं पारडं जड, सामन्याविषयी जाणून घ्या सर्वकाही
विजय आफ्रिकेचा, पण नुकसान न्यूझीलंडचे, Points Tableमध्ये मोठा बदल; इंग्लंड कुठंय पाहा