वनडे विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमधील अव्वल 3 जागांसाठी संघांमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळत आहे. मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे बांगलादेशविरुद्ध 149 धावांनी विजय साकारला. हा दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. या विजयासह आफ्रिकेला पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला. त्यांनी न्यूझीलंडला पछाडत 8 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.
दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाच्या स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एक पराभव सोडला, तर उर्वरित 4 सामने जिंकले आहेत. त्यांना नेदरलँड्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, मागील सामने मोठ्या अंतराने जिंकल्यामुळे त्यांचा नेट रनरेटही खूपच चांगला झाला आहे. आफ्रिकेचा नेट रनरेट हा +2.370 इतका आहे.
भारत पहिल्या, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाने एकतर्फी प्रदर्शन केले आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे ते 10 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये (Points Table) अव्वलस्थानी कायम आहेत. भारताचा नेट रनरेट +1.353 इतका आहे. तसेच, न्यूझीलंड संघ 8 गुणासह तिसऱ्या स्थानी आला आहे. त्यांचा नेट रनरेट +1.481 इतका आहे. ऑस्ट्रेलियन संघ 4 गुणांसह चौथ्या स्थानी असून त्यांचा नेट रनरेट -0.193 आहे.
Points Table update #CWC23
At Halfway stage India 🇮🇳and South Africa🇿🇦 has almost qualified.It will be a tough battle for no.4 between Pakistan,Aus,Eng#ICCCricketWorldCup #CWC2023 #PAKvsSA #INDvsENG #AUSvsNZ#ViratKohli #BabarAzam pic.twitter.com/3ouSik4X8i
— SportsPundit (@_SportsPundit) October 25, 2023
बांगलादेशच्या पराभवामुळे इंग्लंड नवव्या स्थानी
दक्षिण आफ्रिका संघाकडून झालेल्या पराभवानंतर बांगलादेश संघ आता पॉईंट्स टेबलमध्ये 2 गुणांसह दहाव्या स्थानी पोहोचला आहे. तसेच, इंग्लंड संघ 2 गुणांसह नवव्या स्थानी आला आहे. त्यांचा नेट रनरेट -1.248 इतका आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान अजूनही 4 गुणांसह पाचव्या स्थानी आहे, तर 4 गुणांसोबतच अफगाणिस्तानही सहाव्या स्थानी आहे. नेदरलँड्स आणि श्रीलंका संघ प्रत्येकी 2 गुणांसह सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत.
बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 24वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यानंतर पुन्हा पॉईंट्स टेबलमध्ये बदल होताना दिसेल. (world cup 2023 points table after south africa win against bangladesh know other team place here)
हेही वाचा-
‘सेमीफायनलमध्ये पोहोचलो नाही, तर…’, दारुण पराभवानंतर खचला शाकिब, ‘या’ 3 संघांना म्हणाला दावेदार
दक्षिण आफ्रिकेची घौडदौड सुरूच! बांगलादेशचा 149 धावांनी दारूण पराभव, पॉईंट्स टेबलमध्येही नंबर 2