न्यूझीलंड संघाने बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) श्रीलंकेला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासोबतच न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकीटही जवळपास पक्के केले आहे. न्यूझीलंडच्या विजयामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांसाठी विश्वचषक 2023 संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे. श्रीलंकेच्या 172 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 23.2 षटकात मिळवले. आता पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणे जवळपास पक्के झाले आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी केन विलियम्सन याने मोठे विधान केले.
भारताला काय दिली चेतावणी?
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) म्हणाला की, उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. न्यूझीलंड उपांत्य फेरीत भारताविरुद्ध भिडण्यास तयार आहे का? असे विचारताच विलियम्सन म्हणाला, “उपांत्य फेरीत खेळणे विशेष आहे, पण यजमान संघाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत.”
पुढे बोलताना विलियम्सन असेही म्हणाला की, “काही संघ समान गुणांनी स्पर्धेचा शेवट करू शकतात. हे आमच्या हातात नाही. आम्ही दोन दिवस विश्रांती करू. काय होईल माहिती नाही.”
खरं तर, अफगाणिस्तानला नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेला 400हून अधिक धावांनी पराभूत करावे लागेल. तसेच, पाकिस्तानला शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) कोलकात्यात इंग्लंडला कमीत कमी 287 धावांनी पराभवाचा धक्का द्यावा लागेल.
पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे समीकरण
पाकिस्तानला विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी इंग्लंडविरुद्धचा सामना 287 किंवा त्याहून अधिक धावांनी जिंकावा लागेल. जर इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध कोणतेही आव्हान ठेवले, तर पाकिस्तानला हे आव्हान 2.3 षटकात मिळवावे लागेल. तसेच, अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत जागा मिळवायची असेल, तर त्यांना दक्षिण आफ्रिकेला 438 धावांनी पराभूत करावे लागेल. यावरून असे दिसते की, आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा संपल्या आहेत. (CWC 2023 Skipper kane williamson statement playing india in semis will be challenging for us )
हेही वाचा-
खुलासा! मॅक्सवेलने मानलेली हार; म्हणालेला, ‘मला निवृत्त व्हायचंय’, पण फिजिओच्या ‘या’ सल्ल्याने घडवला इतिहास
कुणी तरी येणार येणार गं! विराट लवकरच दुसऱ्यांदा बनणार बाबा, बेबी बंपमध्ये दिसली अनुष्का- Video