नॉटिंगहॅम। आज(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला आहे.
त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडला प्रत्येकी 1 गुण देण्यात आला आहे. आज दिवसभर नॉटिंगहॅममध्ये पावसाच्या सरी येत होत्या. तसेच काहीवेळ मधे पाऊस थांबला होता. परंतू मैदान ओले असल्याने सामना होऊ शकलेला नाही.
या विश्वचषकात रद्द होणारा हा एकूण चौथा सामना आहे. तर नाणेफकही न होता रद्द होणारा या विश्वचषकातील तिसरा सामना आहे.
याआधी 7 जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील सामना आणि 11 जूनला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघातील सामना पावसामुळे नाणेफकही न होता रद्द झाला आहे.
त्याचबरोबर 10 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामनाही पावसामुळेच अनिर्णित राहिला होता. या सामन्यात केवळ 7.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना पुर्ण होऊ शकला नव्हता.
मागील अनेक दिवसांपासून इंग्लंडमध्ये पाऊस सुरु आहे. त्याचा फटका 2019 च्या विश्वचषकातील सामन्यांना बसत आहे. या विश्वचषकातील आगामी काही सामन्यातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
😔 news from Nottingham!
Today's #CWC19 clash between India and New Zealand has been called off. pic.twitter.com/KxS473F7Rg
— ICC (@ICC) June 13, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानच्या कर्णधाराला केले अफलातून रनआऊट, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: या दोन संघात होणार अंतिम सामना, गुगल सीईओ सुंदर पिचाईनी व्यक्त केला अंदाज
–संपूर्ण वेळापत्रक: असा असेल विश्वचषकानंतर होणारा टीम इंडियाचा विंडीज दौरा