---Advertisement---

राखीव क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाने घेतला जेसन रॉयचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ

On: रविवार, जून 30, 2019 6:51 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। आज विश्वचषक 2019 स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध भारत संघात 38 वा सामना एजबस्टन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

या निर्णयाला योग्य ठरवत इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने भारताला सुरुवातीला यश मिळू न देता तब्बद 160 धावांची सलामी भागीदारी रचली. अखेर 23 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आलेल्या रविंद्र जडेजाने रॉयचा अफलातून झेल घेत ही जोडी तोडली.

झाले असे की कुलदीपने या षटकातील पहिला चेंडू गुगली टाकला. यावर रॉयने जोरदार फटका मारला. पण लॉन्ग ऑनला असणाऱ्या जडेजाने डावीकडे पळत जाऊन स्वत:ला झोकून देत हा चेंडू झेलला. त्यामुळे रॉयने विकेट गमावली.

रॉयने 57 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच तो बाद झाल्यानंतर काही वेळाने बेअरस्टो 111 धावांची शतकी खेळी करुन बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. त्यानंतर लगेचच शमीने इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनलाही 1 धावेवर बाद केले.

पण त्यानंतर जो रुट आणि बेन स्टोक्सने इंग्लंंडचा डाव सांभाळताना चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. पण पुन्हा एकदा शमीनेच रुटची 44 धावांवर विकेट घेत भारताला चौथे यश मिळवून दिले.

यानंतर जोस बटलरलाही(20) शमीने स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. पण अखेर स्टोक्सने 79 धावांची अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला 50 षटकात 7 बाद 337 धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून शमीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

https://twitter.com/sumanmagician/status/1145304506814459904

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक इतिहासात असा पराक्रम करणारा मिशेल स्टार्क पहिला गोलंदाज

संपूर्ण यादी – विश्वचषक इतिहासात आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतली आहे हॅट्रिक

शमी पाठोपाठ ट्रेंट बोल्टनेही घेतली २०१९ विश्वचषकात हॅट्रिक, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment