बर्मिंघम|भारत विरुद्ध बार्बाडोस महिला संघ (INDvsBAR) यांच्यात बुधवारी (०३ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील दहावा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने गोलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत बार्बाडोसवर एकतर्फी विजय मिळवला. १०० धावांच्या फरकाने हा अखेरचा साखळी फेरीतील सामना जिंकत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर बार्बाडोसचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. यावेळी जेमिमाह रोड्रिगेज आणि रेणुका सिंग यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. बार्बाडोस संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथम फलंदाजी करताना विशेष प्रदर्शन करता आले नाही. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. त्यामुळे बार्बाडोसला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान मिळाले आहे. त्याच्या प्रत्युत्तरात बार्बाडोसचा संघ २० षटकात ८ बाद ६२ धावा करू शकला.
यावेळी रेणुका सिंगची गोलंदाजी विशेष ठरली आहे. तिने ४ षटके टाकताना १० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तिला बाकी गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. या सामन्यात भारताच्या ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली. यामध्ये मेघना सिंग, स्नेह राणा, राधा यादव आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. आणखी एक बाब म्हणजे एकाही भारतीय गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट ४च्या वर गेला नाही. यामुळे पहिल्या डावात जेमिमाहची तर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी उत्तम प्रदर्शन केले आहे.
तत्पूर्वी, भारताकडून जेमिमाह रोड्रिगेज हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने चिवट झुंज देत अर्धशतक झळकावले. ४६ चेंडू खेळताना १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५६ धावांवर ती नाबाद राहिली. तसेच सलामीवीर शेफाली वर्मा हिनेही झंझावाती खेळी केली. मात्र फक्त ७ धावांनी तिचे अर्धशतक हुकले. तिने २६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. तसेच दिप्ती शर्मा हिनेही नाबाद ३४ धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG 2022: जेमिमाहच्या अर्धशतकाने सावरला भारताचा डाव, बार्बाडोसपुढे विजयासाठी १६३ धावांचे आव्हान
रोहितच्या अनुपस्थितीत ‘हे’ ३ खेळाडू सांभाळू शकतात सलामीची जबाबदारी, एकाला तर दांडगा अनुभव
मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिल्यामुळे ९ वर्षांनी घरी गेला ‘हा’ खेळाडू, वाचा कारण