---Advertisement---

मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिल्यामुळे ९ वर्षांनी घरी गेला ‘हा’ खेळाडू, वाचा कारण

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 8:06 PM
Mumbai-Indians
---Advertisement---

आपल्यापैकी प्रत्येकाचे लहानपणी एक मोठा क्रिकेटपटू बनण्याचे आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. युवा वर्गात इतर खेळांविषयी देखील उत्सकता असते, पण क्रिकेटचा चाहता वर्षा एका वेगळ्याच पातळीचा आहे. खेळाडू कोणताही असो, त्याला कारकीर्द मोठी बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोच. अनेकांचा हा संघर्ष वर्षानूवर्ष चालतो. मुंबई इंडियन्सचा युवा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय यानेही बराच संघर्ष केला आहे आणि आता मोठ्या काळानंतर तो स्वतःच्या घरी आहे. 

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने कुमार कार्तिकेय (Kumar Kartikeya) याला पदार्पणाची संधी दिली. कार्तिकेयने मंगळवारी (२ ऑगस्ट) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट केली. पोस्टमधून समजते की, तोब्बल ९ वर्षांपेक्षा जास्त काळापासून तो कुटुंबीयांशी भेटला नव्हता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “९ वर्ष आणि ३ महिन्यांनंतर माझे कुटुंब आणि आईला भेटलो. माझ्या भावना मी व्यक्त करू शकत नाही.”

दरम्यान, कार्तिकेयने मध्यंतरी त्याच्या कुटुंबाविषयी महत्वाची माहिती दिली होती. त्याने असे सांगितले होते की, तो आयुष्यात काहीतरी मोठे केल्यानंतरच तो घरी जाईल. मे महिन्यात तो म्हणाला होता की, आयपीएल २०२२ हंगाम झाल्यानंतर तो घरी जाईल आणि आता त्याने तसे केलेही आहे.

आयपीएल २०२२ मध्ये ३० एप्रिल २०२२ रोजी कार्तिकेयने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केले. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात २४ वर्षीय कार्तिकेयने ४ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ४.८० च्या इकोनॉमीने १९ धावा खर्च करून १ विकेटही घेतली होती. मुंबई इंडियन्सने हा सामना ५ विकेट्सने जिंकला होता. त्याने आयपीएल २०२२ हंगामात एकूण ४ सामन्यांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्याने ७.८५ च्या इकोनॉमीने १०२ धावा खर्च केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर

विराट कोहलीच्या कारकिर्दीला उतरती कळा..! टी२० क्रमवारीत ८ वर्षांतील सर्वात वाईट स्थानी घसरण

सूर्यकुमार यादवची नवीन स्पोर्ट्स कार, वेस्ट इंडीजची धुलाई केल्यानंतर दिले स्वतःलाच गिफ्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---