इंग्लंडचे अनेक माजी क्रिकेटपटू नेहमी आयपीएलला नावे ठेवत असतात. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टनेही नुकतेच आयपीएलचे वर्चस्व जागतिक क्रिकेटला धोकादायक असल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणात बांगलादेशचा कर्णधार व दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसनने एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. आपण आयपीएलमुळेच यशस्वी झाल्याचे त्याने म्हटले.
बांगलादेशचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू असलेल्या शाकिबने एका कार्यक्रमात आयपीएल व आयपीएलमधील आपल्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली. शाकिब म्हणाला,
“आयपीएल हे एक व्यासपीठ आहे जिथे जगभरातील खेळाडू खेळू इच्छितात. आयपीएलमध्ये खेळणे ही खेळाडूंसाठी नेहमीच मोठी संधी असते. कारण तेथे बरेच काही शिकायला मिळते. २०१९ च्या विश्वचषकापूर्वी, मी बहुतेक वेळ बेंचवर घालवला होता. मात्र, तिथे असताना मला बरेच काही शिकायला मिळाले. जॉनी बेअरस्टो, राशिद खान, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन आणि इतर दिग्गज खेळाडूंना पाहून मी सर्वोत्तम बनलो. ते जगावर राज्य का करतात हे मला तिथे समजले. जर मी आयपीएलमध्ये नसतो तर मला ते कळले नसते.”
शाकिब पुढे बोलताना म्हणाला,
“२०१९ च्या विश्वचषकादरम्यान, मी केवळ आयपीएलच्या मदतीने इतकी चांगली कामगिरी करू शकलो. आयपीएल असो किंवा सीपीएल हे खूप महत्त्वाचे आहे. येथे मला मिळालेल्या अनुभवाचा फायदा बांगलादेश क्रिकेटला झाला आहे. केवळ आयपीएलच नाही तर कोणत्याही लीगला विरोध करण्यात अर्थ नाही.”
शाकिब २०११ पासून आयपीएलचा भाग आहे. जगातील या सर्वात प्रतिष्ठित लीगमध्ये त्याने ७१ सामने खेळले आहेत. शाकिब आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी खेळला आहे. या लीगमध्ये त्याने ७९३ धावा केल्या आहेत. तसेच ६३ बळीही मिळवलेत आहेत. यादरम्यान तो कोलकाता नाईट रायडर्ससह दोन वेळा विजेताही बनला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
माजी क्रिकेटरचा भारताच्या संघ निवडकर्त्यालाच दम! म्हणाला, ‘टी२० विश्वचषकासाठी योग्य टीम निवड’
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर