संघात खेळाडूंचे आत-बाहेर येणे-जाणे होतच असते. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या (India Tour Of West Indies) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेल्या वनडे मालिकेत अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संघात घेतले गेले. आता टी२० मालिका सुरू असून त्यात जडेजा संघात परतला आहे. भारताने पहिला टी२० सामना ६८ धावांनी जिकंला. या सामन्यात अंतिम अकरामध्ये कर्णधार रोहित शर्माने जडेजाला संघात घेतले. त्यामुळे त्याच्याजागी वनडे मालिका खेळलेल्या खेळाडूला बाकावर बसावे लागले.
जडेजामुळे मॅचविनर झाला बाहेर
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) वनडे मालिकेतून रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे बाहेर होता. त्यामुळे अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) याला संघात जागा मिळाली होती. त्याने अंतिम अकरामध्ये खेळताना उत्तम कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत संघाला सामना जिंकून दिला होता. त्यामुळे भारताने मालिका ३-० अशी (India Clean Sweep West Indies) जिंकली होती. मात्र जडेजा संघात आल्याने त्याला बाहेर व्हावे लागले आहे.
अक्षरची वनडे मालिकेत उल्लेखनीय कामगिरी
तीन सामन्याच्या या वनडे मालिकेत अक्षरला तिन्ही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने यामध्ये गोलंदाजी बरोबरच फलंदाजीतही दम दाखवला. त्याला दोन सामन्यात फलंदाजी मिळाली होती.
अक्षरने या वनडे मालिकेत ८५च्या सरासरीने ८५ धावा आणि ५.५०च्या इकॉनॉमी रेटने २ विकेट्स घेतल्या. त्याने दुसऱ्या सामन्यात ३५ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. त्याच्या या विस्फोटक खेळीने भारताने तो सामना २ चेंडू शिल्लक राखत २ विकेट्सने जिंकला. तसेच मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती.
वेस्ट इंडिजमध्ये रविंद्र जडेजाची टी२०तील कामगिरी
गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजा (Ravindra Jadeja injury) वनडे मालिकेला मुकला होता. तो पूर्णपणे ठीक होऊन संघात परतला. पहिल्या टी २० सामन्यात त्याने १३ चेंडूत १६ धावा आणि ४ षटकात २६ धावा देत १ विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
CWG Breaking: अवघ्या १९ व्या वर्षी जेरेमीने रचला इतिहास! जिंकले कॉमनवेल्थ गोल्ड
शाहरूख खानने अवघ्या चार चेंडूत विरोधी संघाच्या अंतिम फेरीच्या आशेवर फेरले पाणी