युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूनंतर जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये स्वप्नवत कामगिरी केली. युवा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या जेरेमीनी ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत त्याने राष्ट्रकुलमधील विक्रमही केला. त्याचवेळी जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलले.
https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1553690147589222401?t=SDmIjS2nGwbX56W6b8sy7A&s=19
https://twitter.com/narendramodi/status/1553692906841677824?s=20&t=ilkJVkmqeZAwJ_Itw04Hlg
जेरेमीने ३०० किलो वजन उचलून राष्ट्रकुल विक्रम केला. रौप्यपदक सामोआच्या नेवोने जिंकले. त्याला एकूण २९३ किलो वजन उचलण्यात यश लागले. तो अखेरच्या प्रयत्नात १७४ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरल्याने सुवर्ण जेरेमीच्या पदरात पडले. जेरेमीच्या या सुवर्णासह भारताच्या नावावर आता २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण ५ पदके झाली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. मीराबाई आणि जेरेमी यांनी सुवर्ण, संकेत सरगर आणि बिंदिया राणी यांनी रौप्य आणि गुरुराजा पुजारीने कांस्यपदक जिंकले आहे.
जेरेमीचे वडील ज्युनियर नॅशनल चॅम्पियन बॉक्सर राहिले आहेत. जेरेमी आणि त्याचे ४ भाऊ देखील त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉक्सिंग रिंगमध्ये उतरले. परंतु, जेरेमीने वेटलिफ्टिंग पाहिल्यानंतर वेटलिफ्टर होण्याचा निर्णय घेतला. जेरेमीच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, २०१८ च्या युवा ऑलिंपिकमध्ये त्याने ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेले. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरूख खानने अवघ्या चार चेंडूत विरोधी संघाच्या अंतिम फेरीच्या आशेवर फेरले पाणी
‘कोहलीमुळेच भारत टी२० विश्वचषक जिंकू शकत नाही’, पाकिस्तानी दिग्गजाने सोडले टीकास्त्र






