बर्मिंघम येथे सुरू असलेल्या २२व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय हॉकीचे दोन्ही संघ अप्रतिम कामगिरी करत आहेत. त्यातच भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी (७ ऑगस्ट) कांस्य पदकाच्या सामन्यात न्यूझीलंडचा शूटआउटमध्ये पराभव केला आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताची कर्णधार-गोलकिपर सविता पुनिया हिने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. सामन्याची पूर्णवेळ झाली असता सामना १-१ असा बरोबरीत राहिला. नंतर भारताने न्यूझीलंडला शूटआउटमध्ये २-१ असे पराभूत करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाने खचून न जाता भारताने त्यांचा आज अप्रतिम खेळ केला आहे. २०१८चा चॅम्पियन न्यूझीलंडला भारताने चांगलीच टक्कर दिली.
What a match!!
Nzl 🇳🇿nearly pulling of a heist!!
Finally Indian 🇮🇳women hockey 🏑 team wins bronze🥉medal in shootout!
This is our 1st medal🏅after 16 yrs.
Many congrats to team👏
Special mention of Capt Savita Punia pulling 4 saves 😍 what a goalkeeper!#IndVsNzl #Hockey pic.twitter.com/bWirBjTZrz
— Soug (@sbg1936) August 7, 2022
पहिले सत्र
न्यूझीलंडला पहिल्या सत्रातच पेनाल्टी कॉर्नर मिळाली. त्यांच्याकडे गोल करण्याची संधी असताना त्यांना अपयश आले. भारताकडून सलिमा टेटे आणि संगीता कुमारी यांचीही गोल करण्याची संधी हुकली. या सत्रात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकही गोल न केल्याने सामना ०-० अशाच राहिला.
दुसरे सत्र
दुसरे सत्र भारताच्याच नावावर राहिले. नवनीत कौर आणि नेहा यांचा शॉट विरोधी गोलकिपरने रोखला. तर सलिमा टेटेने २९व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या सत्रात भारताने त्यांचा खेळ उंचावला यामुळे न्यूझीलंडला एकही पेनाल्टी कॉर्नर मिळाली नाही.
तिसरे सत्र
या सत्रात न्यूझीलंडने अनेक गोल करण्याच्या संधी गमावल्या, तर भारताने त्यांचा आक्रमक सुरूच ठेवला. यावेळी उदीताला मिळालेला शॉट पेनाल्टी कॉर्नर विरोधी संघाच्या खेळाडूने अडवला. या सत्रातही भारताने अप्रतिम खेळ करत न्यूझीलंडला बरोबरी करू दिली नाही.
चौथे सत्र
हे सत्र या सामन्यातील सर्वात नाट्यमय झाले आहे. न्यूझीलंडची सामना बरोबरीत आणण्याची धडपड सुरू होती. दुसरीकडे भारताचे अजून काही गोल झाले असते, मात्र काही पेनाल्टी कॉर्नर हुकले. काही गोल करण्यापासून रोखण्यात आले. तसेच काही व्हिडिओ रेफरलमध्ये बाद झाले.
या सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला न्यूझीलंडला पेनाल्टी कॉर्नर मिळाली होती. त्याच गोधंळात नवनीतचा पाय लागल्याने न्यूझीलंडला पेनाल्टी स्ट्रोक मिळाला. यानंतर ऑलिव्हिया मेरीने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला आणि शूटआउटमध्ये गेला.
🥉 Bronze Medal for India
A thrilling match results in a victory for the #WomenInBlue in the Birmingham 2022 Commonwealth Games!#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/uckOUUX8Si
— Hockey India (@TheHockeyIndia) August 7, 2022
पेनाल्टी शूटआउटमध्ये नवनीत कौर आणि सोनिका यांनी गोल केले, तर नेहाचा शॉट हुकला. पदक जिंकणाच्या या अतिमहत्वाच्या क्षणात सविताने दोन गोल रोखले.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची कामगिरी
भारतीय महिला हॉकीने १६ वर्षानंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकले आहे. याआधी २००२मध्ये मॅनचेस्टर येथे झालेल्या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक आणि २००६मध्ये मेलबर्न येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले होते.
भारताचे २०२२च्या या स्पर्धेतील हे ४१वे पदक ठरले आहे. आतापर्यंत भारताने १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदक जिंकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?
CWG BREAKING: बॉक्सिंगमध्ये सोन्याने सुरुवात; नवख्या नीतूचा गोल्डन पंच
त्याला काय फिरायला आणलंय? वेस्ट इंडिज दौऱ्यावर एका संधीसाठी तरसतोय ‘हा’ टॅलेंटेड भारतीय स्पिनर