---Advertisement---

CWG 2022: ज्ञानसेकरन सथियानने रचला इतिहास! टेबल टेनिसमध्ये पुरूषांच्या एकेरीत जिंकले कांस्य

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 6:06 PM
Sathiyan Gnanasekaran
---Advertisement---

ज्ञानसेकरन सथियानने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२२मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. त्याने टेबल टेनिसमध्ये पुरूषांच्या एकेरीत इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉलचा ११-९, ११-३, ११-५, ८-११, ९-११, १०-१२, ११-९ असा पराभव केला आहे.

ज्ञानसेकरन सथियान (Sathiyan Gnanasekaran) याचे हे पुरूष एकेरीतील पहिलेच कॉमनवेल्थ गेम्सचे पदक ठरले आहे. तसेच भारताचे हे टेबल टेनिसमधील या स्पर्धेतील तिसरे पदक आहे. याआधी मिश्र जोडीमध्ये शरथ कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने मलेशियाच्या जावेन चांग आणि करेन लिनला ११-४, ९-११, ११-५, ११-६ असे पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. तर पुरूषांच्या दुहेरीत ज्ञानसेकरन आणि शरथ कमल यांनी कांस्य पदक जिंकले.

सुरूवातीचे तीन सेट जिंकूनसुद्धा ज्ञानसेकरनला पदक जिंकण्यासाठी कठोर मेहनत करावी लागली. तर त्याच्या विरोधी खेळाडूने तीन सेट जिंकत पुनरागमन केले. यामुळे ज्ञानसेकरनच्या अडचणीत वाढ झाली. शेवटचा सेट ८-८ असा बरोबरीत असताना त्याने उत्तम खेळ करत सेट ११-९ असा जिंकत सामना आपल्या नावे केला

ज्ञानसेकरन सथियानची कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरी

चेन्नईचा असलेला ज्ञानसेकरन हा जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर आहे. त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनेक पदके जिंकली आहेत, मात्र एकेरीतील त्याचे हे पहिलेच पदक आहे. त्याने २०१८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरूष संघात सुवर्ण, दुहेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्य जिंकले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

‘हार्दिकला बनायचे आहे भारताचा पूर्णवेळ कर्णधार!’, वाचा पाचवा टी-२० सामना जिंकल्यावर काय म्हणाला

ऑस्ट्रेलियाची पुन्हा सरशी! हॉकी फायनलमध्ये भारताचा ७-० ने दारूण पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---