---Advertisement---

ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 8:25 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी लागू शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की,

‘जसप्रीत बुमराह आगामी आशिया चषक खेळणार नाही. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत तो बरा होत टी२० विश्वचषकात दिसू शकतो. त्याची दुखापत तितकीशी गंभीर नाही. मात्र, विश्वचषकाच्या दृष्टीने आम्ही कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. तो विश्रांती आणि दुखापतीतून सावरण्यासाठी काही वेळ घेईल.”

बुमराह अखेरच्या वेळी भारतीय संघासाठी इंग्लंड दौऱ्यावर ‌‌‌वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. त्यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यावरील वनडे व टी२० मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली गेली होती. इंग्लंड दौऱ्यावरच त्याने प्रथमता कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्वही केले होते.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषक खेळला जाणार आहे. हा आशिया चषक टी२० प्रकारात खेळला जाईल. बुमराह अनुपस्थितीत असल्याने भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार करताना दिसेल. त्याला आवेश खान, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी हे साथ देताना दिसू शकतात.

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह हा टी२० विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसू शकतो. विश्वचषकात भारताचे दोन संघ खेळताना दिसणार आहेत. एक संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात वनडे मालिका खेळेल. तर, विश्वचषकासाठी निवडलेला प्रमुख संघ ऑस्ट्रेलियात टी२० मालिकेत भाग घेताना दिसेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया टी२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलिया भूषवणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---