इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश स्पर्धेत भारतासाठी सौरव घोषालने कांस्य पदक पटकावले. यजमान इंग्लंडचा खेळाडू जेम्स विल्सट्रॉप याला सौरवने ०-३ अशा अंतराने पराभूत केले.
सौरव घोषाल (Saurav Ghosal) स्क्वॅश खेळातील जगातील १५ व्या क्रमांकाच खेळाडू आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा जेम्स विल्सट्रॉप जगातील २४ व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. कॉमवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदकासाठी जेव्हा हे दोघे एकमेंसामोर आले, तेव्हा सौरवपुढे जेम्स विल्सट्रॉप खूपच दुबळा दिसला. सौरवने हा सामना ११-६, ११-१, ११-४ अशा अंतराने जिंकला. स्क्वॉश एकेरी स्पर्धेत भारताचे हे कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील पिहले पदक आहे. यश मिळवल्यानंतर सौरवच्या भावना अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले.
असे असले तरी, सौरवचे हे कॉमवेल्थ गेम्समधील दुसरे पदक आहे. त्याने २०१८ मध्ये गोल्स कोस्ट दुहेरी स्पर्धेत दीपिका पल्लीकलसोबत रौप्य पदक पटकावले आहे. दरम्यान, विल्सट्रॉपविरुद्ध खेळताना सौरवने सुरुवातीपासूनच वर्चस्व तयार केले. विल्सट्रॉपने पहिल्या सेटमध्ये सौरवला टक्कर दिण्याचा प्रयत्न केला, मात्र सौरवने त्याला जास्त गुण मिळवू दिले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये विल्सट्रॉफ एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे वाटत होता. कारण तो या सेटमध्ये फक्त १ गुण मिळवून शकला. तिसऱ्या सेटमध्ये परिस्थिती फारशी बदलली नाही. सौरव घोषलने या सेटमध्येही स्वतःचे वर्चस्व कायम राखले.
https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1554882742952738816?s=20&t=E6ciD4GaoBvyAYF_gw7Zsw
दरम्यान, सौर २०१० पासून कॉमवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आला आहे. पहिल्या प्रयत्नात तो तिसऱ्या फेरीतून बाहेर झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये तो कांस्य पदकाच्या अगदी जवळ पोहचून पराभूत झाला. २०१८ मध्ये त्याला पदक जिंकता आले नाही. या तीन प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आले असले तरी, यावर्षी मात्र त्याने कांस्य पदक जिंकले. तत्पूर्वी स्क्वॉश दुरेही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जोशना चिनप्पा आणि हरिंदर पास सिंग संधू या जोडीने उप उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे. कॉमवेल्थ गेम्सच्या सहाव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या १८ झाली आहे. यामध्ये पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
CWG2022: तेजस्विन शंकरने जिंकले कांंस्य, उंच उडीत पदक जिंकणारा बनला पहिलाच भारतीय
रोहितनंतर सलामीवीर म्हणून टी२०त स्म्रीतीचाच बोलबाला, बनलीये पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर
रोहितच्या अनुपस्थितीत ‘हे’ ३ खेळाडू सांभाळू शकतात सलामीची जबाबदारी, एकाला तर दांडगा अनुभव






