बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय युवा महिला बॉक्सर नीतू घंघासने भारताच्या झोळीत बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक टाकले आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने यजमान इंग्लंडच्या बॉक्सरचा पराभव केला. तिच्या ठोश्यांचे इंग्लंडच्या बॉक्सरकडे उत्तर नव्हते. तीन फेऱ्या चाललेल्या सामन्यात तीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला दबदबा राखत भारताचे नाव उंचावले. रेफ्रींनी तिन्ही फेऱ्यांमध्ये नीतूला इंग्लिश बॉक्सरपेक्षा जास्त गुण दिले.
https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1556218142107398145?s=20&t=l4hC2kKipCMPU1YhtAHL4g
राष्ट्रकुल स्पर्धेत नीतूने भारतासाठी १४ वे सुवर्ण जिंकले. नीतूची इंग्लिश बॉक्सरसोबतची लढत तिन्ही फेऱ्यांमध्ये जबरदस्त झाली. दोघींमधील आक्रमकता शिगेला पोहोचली होती. मात्र, त्या आक्रमकतेसोबतच जिंकण्यासाठी आवश्यक असलेला संयम नीतूच्या खेळात दिसत होता.
पहिल्या फेरीत ५ पैकी ४ रेफ्रींनी नीतूला १०-१० गुण दिले. त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही रेफ्रींचा निर्णय तिच्याच बाजूने आला. तिसऱ्या फेरीनंतर सर्व रेफ्रींनी निर्णय नीतूच्या बाजूने दिला. इंग्लंडच्या बॉक्सरविरुद्ध, नीतूला तिच्या उंचीचा मोठा फायदा झाला. त्यामुळे तिला ठोसे मारणे सोपे झाले. नीतू तिच्या इंग्रजी प्रतिस्पर्ध्यावर प्रत्येक बाबतीत वरचढ ठरली.
निखत झरीनकडूनही भारताला अपेक्षा
नीतू प्रमाणेच दुसरी भारतीय महिला बॉक्सर अनुभवी निखत झरीन तिच्याकडून देखील भारतीय संघाला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. ति सायंकाळी आपला अंतिम फेरीचा सामना खेळेल. दुसरीकडे, अनुभवी पुरुष बॉक्सर अमित पंघल यानेही सुवर्णपदक पटकावले. त्यानेदेखील अंतिम फेरीत यजमान इंग्लंडच्या बॉक्सरला पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-