---Advertisement---

काय सांगता! थेट ‘स्टेनगन’ डेल स्टेनच्या घरी चोरट्यांचा धुमाकूळ, वाचा काय केलं नुकसान

On: गुरूवार, जून 11, 2020 10:21 PM
---Advertisement---

मुंबई ।  ‘स्टेन गन’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याच्या घरात चोराने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमध्ये तीनदा त्याच्या घरात चोराने घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे त्याची आई भयग्रस्त झाल्याचे स्टेनने सांगितले. 

स्टेनने मंगळवारी रात्री ट्वीट करत लिहिले की, “शुक्रवारी माझ्या घरात तीनदा चोरांनी घुसण्याचा प्रयत्न केला. काल त्यांनी माझ्या मित्राच्या गाडीची तोडफोड केली. चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या घरात आई एकटीच होती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली.”

दक्षिण आफ्रिकेमध्ये 1 जूनपासून तिसर्‍या टप्प्यातला लॉकडाऊन सुरू झाल्याने तेथे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत लॉकडाउन लागू केल्याने आधीच लोक त्रस्त आहेत. त्यात अशा घटनांची भर पडली आहे.

स्टेनने मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याने 93 कसोटी सामन्यात 22.95 च्या सरासरीने 439 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडे सामन्यात 196 आणि टी20 मध्ये 64 विकेट्स घेण्याची नोंद त्याच्या नावावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---