---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळापेक्षा पैशांची जास्त चर्चा होते म्हणणाऱ्या स्टेनला मागावी लागली माफी, म्हणाला…

On: बुधवार, मार्च 3, 2021 2:48 PM
---Advertisement---

पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीगचा म्हणजेच पीएसएलचा थरार सुरू आहे. विदेशातील अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये सामील झालेले दिसून येतात. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन या लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग आहे. अशात नुकतेच स्टेनने आयपीएलमध्ये पैशांची जास्त चर्चा चालते, त्यापेक्षा पीएसएलमध्ये खेळणे चांगले असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर तो मोठ्या संकटात सापडला असून त्याला अखेर सर्वांची क्षमा मागावी लागली आहे.

त्याचे झाले असे की, स्टेनने भारतातील सुप्रसिद्ध आयपीएल व पीएसएल यांची तुलना करताना म्हटले, “आयपीएलपेक्षा इतर लीगमध्ये खेळणे फायदेशीर ठरते. आयपीएलमध्ये मोठमोठी पथके असतात आणि तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत याची जास्त चर्चा होत असते. त्यामुळे क्रिकेट मागे पडते. मला या चर्चेतून काहीवेळ सुटका हवी होती. खेळाला महत्त्व दिले जाणे गरजेचे आहे.”

स्टेनच्या या भाष्यानंतर आयपीएल प्रेमींनी तर त्याच्यावर निशाणा साधलाच, सोबतच अजिंक्य रहाणेनेही त्याला खडे बोल सुनावले. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपुर्वी उपकर्णधार रहाणे एका पत्रकार परिषदेत म्हणाला, “आयपीएलने फक्त भारतीय नव्हे तर परदेशी खेळाडूंनाही आपली वेगळी ओळख निर्णाम करण्यासाठी मंच दिला आहे. मी फक्त एवढे सांगू इच्छितो की, आयपीएलने जगभरातील टी२० क्रिकेटची शैली बदलून टाकली आहे.”

यानंतर नुकतीच स्टेनने ट्विट करत सर्वांची क्षमा मागितली आहे. “आयपीएलचे आणि त्यातील खेळाडूंचे माझ्या कारकिर्दीत तितकेच महत्त्व आहे. आयपीएलचा अपमान करणे, त्याला तुच्छ लेखणे किंवा त्याची इतर लीगबरोबर तुलना करण्याचा माझा हेतू नव्हता. जर माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा,” अशा शब्दात त्याने ट्विट केले आहे.

आयपीएलमधील मोठे नाव होता स्टेन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच स्टेन आयपीएलमधील देखील मोठ्या खेळाडूंमध्ये सामील होता. स्टेनने आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद व गुजरात लायन्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ९५ सामने खेळताना ९७ बळी मिळविले आहेत.

आयपीएल २०२० मध्ये अतिशय सुमार कामगिरी केल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला करारमुक्त केले होते. त्यानंतर त्याने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

बापरे बाप! ५४४७ चेंडू अन् १९८१ धावा, कसोटी इतिहासातील सर्वात मोठा सामना; ‘इतके’ दिवस झालती मॅच

… म्हणून पुजारा डावखुऱ्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर होतोय बाद, माजी प्रशिक्षकाने हेरली चूक

एक हात फ्रॅक्चर असतानाही दिली काट्याची टक्कर, वॉर्नरच्या मुलीचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---