इस्ट लंडन। काल (12 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बफेलो पार्क येथे पार पडला. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 धावेने विजय मिळवला. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने जवळजवळ 1 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
त्याने पुनरागमन करताना इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलरची विकेटही घेतली. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे. स्टेनच्या आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना 45 सामन्यात 62 विकेट्स झाल्या आहेत.
त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेकडून टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना इम्रान ताहीरला मागे टाकले आहे. ताहीरने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 35 सामन्यात 61 विकेट्स घेतल्या आहेत.
https://twitter.com/OfficialCSA/status/1227655249764155394
काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 177 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. पण इंग्लंडला 20 षटकात 9 बाद 176 धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
62 विकेट्स – डेल स्टेन (45 सामने)
61 विकेट्स – इम्रान ताहीर (35 सामने)
46 विकेट्स – मॉर्ने मॉर्केल (46 सामने)
41 विकेट्स – वेन पार्नेल (40 सामने)
37 विकेट्स – जोहान बोथा (40 सामने)
https://twitter.com/Maha_Sports/status/1227859745194700800
https://twitter.com/Maha_Sports/status/1227585880111497216