शिखर धवन याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मंगळवारी (11 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताने पुढचे दोन्ही सामने जिंकले. भारताच्या एकदिवसीय संघाने ज्या पद्धतीने प्रदर्शन केले, ते पाहता पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या चर्चा रंगत आहेत. असात दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्टेनच्या मते भारताकडे एक असा फलंदाज आहे जो पुढच्या वर्षीच्या विश्वचषकात पंतची जागा घेऊ शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना वेळेच्या आधी संपल्याचे पाहायला मिळाले. कारण ठरले दक्षिण आफ्रिकी संघाची खराब फलंदाजी. आफ्रिकी संघ मंगळवारी प्रथम फळंदाजी करताना अवघ्या 99 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि 19.1 षटकात विजय मिळवला. तत्पूर्वी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला होता. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने 84 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 93 धावांची खेळी केली होती. ही खेळी पाहिल्यानंतर रिषभ पंतची चिंता नक्कीच वाढू शकते, असे डेल स्टेन म्हणाला.
माध्यमांशी बोलत असताना स्टेनने इशान किशनला ठेवलेल्या टोपण नावाचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “100 टक्के, मी आयपीएलमध्ये काही काळापूर्वी त्याच्यासोबत खेळलो होतो. तो एका लहान मुलासारखा होता. आम्ही त्याल जस्टिन बीबर नाव ठेवले होत, कारण तो एखाद्या रॉकस्टारसारखा दिसत होता. मी त्याल स्वतःमध्ये सुधारणा करताना पाहिले आहे. त्याने नॉर्किएला मारलेले षटकार लहान नव्हते. हे टायमिंग आणि ताकतीने मारलेले शॉट्स होते. गोलंदाजाला कधी माराचये हे फक्त समजले पाहिजे. तो एक महान खेळाडू आहे. भारतीय संघात रिषभ पंतला याला चिंता वाटली पाहिजे, कारण कोणीतरी त्याची जागा घेण्यासाठी येत आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंड्याला टक्कर द्यायला आला ‘हा’ ऑलराऊंडर! टी20 सामन्यात तुफानी फिफ्टी आणि घेतल्या 6 विकेट्स
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ






