भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना लखनऊ येथे खेळला गेला. पावसामुळे प्रत्येकी 40 षटकांच्या केलेल्या या सामन्यात प्रेक्षकांना रंगतदार सामन्याची मेजवानी मिळाली. विजयासाठी मिळालेल्या 250 धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व संजू सॅमसन यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने 9 धावांनी विजय साजरा करत मालिकेत आघाडी घेतली. भारताकडून संजू सॅमसनने अखेरपर्यंत नाबाद राहत 86 धावांची लाजवाब खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने संजूचे कौतुक केले.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 250 धावांचा पाठलाग करताना भारताने 51 धावांवर चार गडी गमावलेले. तेव्हा संजू फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीला श्रेयस अय्यरला प्रथम साथ दिली. त्यानंतर शार्दुल ठाकूरसह त्याने संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरचे षटकात भारताला विजयासाठी 30 धावांची गरज असताना त्याने तीन चौकार व ्व एक षटकार मारत संघर्ष केला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 9 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 63 चेंडूवर 86 धावा कुटल्या. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
त्याच्या या खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना संजूचे कौतुक केले. तो म्हणाला,
“संजूकडे जबरदस्त मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तो गोलंदाजांना स्थिर होऊ देत नाही. त्याच्याकडे भारताचाच माजी अष्टपैलू युवराज सिंग याच्यासारखी षटकार मारण्याची कला आहे.”
युवराज सिंग हा आपल्या कारकिर्दीत सिक्सर किंग म्हणून ओळखला जायचा. संजू हा देखील आयपीएलमध्ये अशाच प्रकारचे मोठे फटके मारण्यात तरबेज आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद! रबाडाचे आयपीएलबद्दल मोठे भाष्य; म्हणाला, ‘भारतीयांच्या कमजोरीविषयी…’
क्रिकेटला काळीमा फासणारी बातमी! आयपीएलच्या प्रसिद्ध खेळाडूला विमानतळावरून अटक, बला’त्काराचा आरोप