दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाजाने डेल स्टेनने नुकतीच आयपीएलच्या १४व्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या स्टेनने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेत असल्याचे सांगितले होते. मात्र या वर्षी होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमधील लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंच्या यादीत स्टेनच्या नावाचा समावेश आहे.
स्टेन व्यतिरिक्त या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान याही खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. हा लिलाव रविवारी (१० जानेवारी) लाहोर येथे पार पडेल.
पाकिस्तान सुपर लीगचा हा सहावा हंगाम असणार आहे. या हंगामासाठी उपलब्ध असलेल्या परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडचे डेविड मलान, ख्रिस जोर्डन आणि मोईन अली, वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि शेल्डन कॉट्रेल, अफगानिस्तानचा मोहम्मद नबी, दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिन इत्यादी खेळाडूंची नावे आहेत.
२० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगच्या हंगामात जवळपास ४०० परदेशी खेळाडू उपलब्ध असणार आहेत. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी यातील सगळे खेळाडू राष्ट्रीय संघाशी असलेल्या करारामुळे पूर्ण हंगामात उपलब्ध नसतील, असे स्पष्ट केले.
पाकिस्तान सुपर लीगच्या प्लॅटिनम गटातील विदेशी खेळाडू:
ख्रिस गेल, राशिद खान, डेविड मालन, डेल स्टेन, ड्वेन ब्रावो, कार्लोस ब्रैथवेट, लेंडल सिमंस, एविन लुईस, मॉर्ने मोर्कल, रासी वैन डेर डूसन, इमरान ताहिर, कॉलिन इनग्राम, रिली रोसौ, मुजीब-उर-रहमान, मोहम्मद नबी, थिसारा परेरा, इसुरु उडाना, मुस्तफिजुर रहमान, संदीप लॅमिचाने.
महत्वाच्या बातम्या:
रोहित-गिल जोडीची लाजबाव कामगिरी! मागील ५२ वर्षात कुणालाही न जमलेला विक्रम केला नावावर
वाईट वाटतंय, पण नारळ द्यावाच लागेल! आयपीएल लिलावाअगोदर चेन्नई या खेळाडूंना करू शकते बाय बाय
लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर