भारतीय संघ १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने हा दौरा कठीण असणार हे सर्वांनाच अपेक्षित होतं. तसंच या दौऱ्यात भारतीय संघ पराभूत होईल, असा अंदाजही अनेकांना होता. झालेही तसेच भारतीय संघ त्या दौऱ्यातील कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत झाला होता. पण असे असले तरी कोणालाही अपेक्षित नसताना भारतीय संघाने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून मात्र कमाल केली होती.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात १२३ धावांनी विजय मिळवला होता. तरीही हा सामना भारताच्या विजयाबरोबरच एस श्रीसंतच्या कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यातही त्यावेळी श्रीसंत दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आंद्रे निलने केलेल्या स्लेजिंगला सडेतोड उत्तर दिल्याने चर्चेत आला होता.
झाले असे की पहिल्या डावात भारतीय संघाने २४९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ८४ धावसंख्येवर गारद झाला होता. त्यामुळे भारतीय संघाने १६५ धावांनी आघाडी घेतली होती. या पहिल्या डावात एस श्रीसंतने ५ विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्याच्या दुसर्या डावात श्रीसंत जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा ९ विकेट्स गेल्या होत्या आणि भारतीय संघ २१९ धावा करून अडचणी सापडला होता. श्रीसंत मैदानावर येताच त्याच्याविरुद्ध आंद्रे निलने स्लेजिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे वैतागलेल्या श्रीसंतने त्याच्या पुढच्याच चेंडूवर निलच्या डोक्यावरुन थेट षटकार खेचला. त्यावेळी श्रीसंतने मोठा जल्लोष केला होता.
श्रीसंतच्या याच षटकाराबद्दल दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्या क्षणाला ‘ऐतिहासिक’ म्हटले आहे.
#Sreesanth reply to Andre Nel is one of the most hilarious things I've seen in Test cricket. 😅😄Hope he does something similar in the #BiggBoss12 house.#BB12 pic.twitter.com/3CixWBbFj2
— J.P.S (@TheJ_P_S) October 8, 2018
इएसपीएन क्रिकइन्फोने एक ट्विट केले होते की ‘एका फलंदाजाचे नाव सांगा आणि त्याने मारलेला शॉट सांगा, जो तुम्हाला नेहमी आनंद देतो.’
या ट्विटला उत्तर देताना डेल स्टेनने लिहिले होते की ‘श्रीसंत आणि त्याने बॅट स्विंग करत आंद्रे निलला मारलेला षटकार, तसेच त्याने केलेले सेलिब्रेशन, ऐतिहासिक’
Sreesanth and his slog off Andre Nel for 6 with the swinging bat celebration. Legendary
— Dale Steyn (@DaleSteyn62) May 15, 2021
विशेष म्हणजे श्रीसंतने त्या सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. पण तरीही त्याचा या सामन्यातील हा षटकारच नेहमी आठवला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट
बंगळुरू कसोटी टीम इंडियासाठी महत्त्वाची, टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत होऊ शकतो मोठा फेरबदल
‘जॉनी बेयरस्टो आयपीएल खेळतो का?’, इरफान पठाणने असा प्रश्न का विचारला