जवळपास १० वर्षांपुर्वी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वनडेत त्याचे पहिले द्विशतक ठोकत इतिहास रचला होता. पण, दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे म्हणणे आहे की, त्या सामन्यात त्याने सचिनला १९० धावांवर बाद केले होते. पण, पंच इयान गोल्ड याांनी सचिन बाद नसल्याचे सांगितले होते आणि त्यांनी सचिनला बाद दिल्यास ते हॉटेलवर सुखरुप जाऊ शकत नसल्याचे त्यांनी मला सांगितले होते. Dale steyn said sachin tendulkar was out on 190 but ian gould gave not out.
जेम्स एंडरसनसोबत झालेल्या स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टमध्ये बोलताना स्टेनने ग्वालियरमध्ये झालेल्या सचिनच्या विक्रमी खेळीचा उल्लेख केला. तो म्हणाला की, “ग्वालियरमध्ये सचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक केले होते. त्यावेळी पंचाचा निर्णय आपल्या बाजूने नव्हता. मला आठवण आहे की, मी सचिनला १९० धावांवर पायचीत केले होते. पण पंच इयान गोल्ड यांनी सचिन नाबाद असल्याचे सांगितले होते.”
“गोल्ड यांच्या निर्यणानंतर मी त्यांना विचारले होते की, तुम्ही का त्याला नाबाद दिले? यावर ते मला म्हणाले होते की, मित्रा चारही बाजूंना पहा. जर मी सचिन बाद असल्याचे सांगितले असते. तर मी सुखरुप हॉटेलवर परत जाऊ शकलो नसतो.”
स्टेन बोलताना पुढे म्हणाला की, “भारतातील प्रेक्षकांसमोर सचिनला गोलंदाजी करणे हे त्याच्यासाठी खूप कठीण काम होते. जर आपण एखादा वाईट चेंडू टाकला आणि त्यावर सचिनने चौकार मारला. तर असे वाटत होते की सगळे जग तुमच्या मागे लागले आहे.”
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिनने १३६.०५च्या स्ट्राईक रेटने २०० धावा केल्या होत्या. त्याच्या या द्विशतकी कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकाला ४०१ धावांचे आव्हान दिले होते. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकाला फक्त २४८ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे भारताने १५३ धावांनी तो सामना आपल्या खिशात घातला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
जो खेळाडू संघात आपली जागा घेईल त्यालाच धोनी म्हणाला, ‘मित्रा तू आज खेळत आहेस’
खुशखबर! टी-20 विश्वचषकाऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार आयपीएल
धोनीला आयपीएलमध्ये बाद केलं म्हणून मला चेन्नईविरुद्ध पुढच्या सामन्यात…