---Advertisement---

टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाविषयी डेल स्टेनची भविष्यवाणी! वाचा काय म्हणाला दिग्गज

Dale-Steyn
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. गुणतालिकेत सतत फेरबदल होत आहेत. संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशात दिग्गज डेल स्टेन याने मोठे विधान केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाच्या मते दक्षिण आफ्रिका यावर्षी विश्वचषक जिंकू शकतो. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किया संघाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी संघाला सर्वात महत्वाचे योगदान देऊ शकतो, असेही स्टेनला वाटते. 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डेल स्टेन (Dale Steyn) यावर्षीच्या टी-20 विश्वचषकाविषयी बोलत होता. स्टेनच्या मते दक्षिण आफ्रिका संघ यावर्षी टी-20 विश्वचषकात अंतिम सामना जिंकेल. स्टेनच्या मते कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एन्रिच नॉर्किया (Anrich Nortje) दक्षिण आफ्रिकेला विश्वविजेते बनवू शकतात. यावेळी स्टेनने पाच आवडत्या वेगवान गोलंदाजांची नावेही सांगितली. हे पाच गोलंदाज यावर्षीच्या विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी करत आहेत.

विश्वचषकात स्टेनला प्रभावित करणारे पाच वेगवान गोलंदाज –
स्टेन म्हणाला, “रबाडा दक्षिण आफ्रिकीच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत आहे. मला अपेक्षा आहे की, दक्षिण आफ्रिका स्पर्धेत पुढे जाईल आणि हा विश्वचषक जिंकेल देखील. यामध्ये एन्रिच नॉर्किया त्याचे योगदान देऊ शकतो. दोघांकडेही चांगली गती आहे. रबाडा जेव्हा कधी ऑस्ट्रेलियाचा जातो, तेव्हा एका वेगळ्याच पातळीचे प्रदर्शन करतो. तो दक्षिण आफ्रिकी संघाला विश्वचषक जिंकवून देण्यासाठी मदत करेल.”

भारताचा एकही वेगवान गोलंदाज सहभागी नाही –
डेल स्टेनच्या यादीतील पुढचा गोलंदाज इंग्लंडचा दिग्गज मार्क वुड आहे. मार्क वुडविषयी बोलताना स्टेन म्हणाला, “मला वाटते तो त्याच्या चार षटकांच्या स्पेलमधील सर्व 24 चेंडू 140 किमीच्या ताशी गतीने टाकणारा पहिलाच गोलंदाज आसेल. तो अप्रतिम यॉर्कर आणि बाउंसर टाकू शकतो. जर इंग्लंडला पुढे जायचे असेल, तर मार्क वुडला यासाठी योगदान द्यावे लागेल.”

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगावन गोलंदाज मिशेल मार्शविषयी बोलताना डेल स्टेन म्हणाला, “मिचेस स्टार्क एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. त्याला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीविषयी चांगली जाण आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला दोन विश्वचषक जिंकवून देण्यासाठी मदत केली आहे.” पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी स्टेनच्या या यादीत पाचव्या आणि शेवटच्या क्रमांकावर आहे. शाहीनविषयी बोलताना स्टेन म्हणाला, “हा वेगवान गोलंदाज मला खूप प्रभावित करतो. त्याच्या गोलंदाजीत स्विंग आहे आणि तो बाउंसर देखील टाकू शकतो.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचा विश्वचषकातील दुसरा विजय, श्रीलंकेला हरवताच विलियम्सन झाला भलताच खुश
फक्त हे काम केल्याने ऑस्ट्रेलियात नेहमी यशस्वी होतो विराट; आकडेवारीही झकास 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---