---Advertisement---

…म्हणून डेल स्टेनने भारतीय चाहत्याला सुनावले खडेबोल

On: मंगळवार, डिसेंबर 31, 2019 7:17 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वात आपण आतापर्यंत पाहिले होते की चाहते क्रिकेटपटूंची खिल्ली उडवतात किंवा त्यांच्यावर टीका करतात. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) आफ्रिकेची खिल्ली उडवणाऱ्या भारतीय चाहत्यावर टीका केली आहे.

सोमवारी (30 डिसेंबर) ओवल येथे दक्षिण आफ्रिकाने इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 107 धावांनी (Won by 107 Runs) विजय मिळवला.

यावेळी डेल स्टेनने कर्णधार फॅफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) यांचे अभिनंदन केले आहे.

दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यानंतर भारतीय चाहत्याने ट्विटरवर लिहिले होते की, आफ्रिकेने हा सामना आपल्या मायदेशात जिंकला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना स्टेनने लिहिले की, “म्हणजे भारताने भारतात जिंकलेल्या सामन्याला विजयी समजले नाही पाहिजे. तसंही देवाने यामध्ये काही केलेले नाही. वेड्या.”

 

सेन्च्यूरियन येथे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला (England) 107 धावांनी पराभूत करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---