---Advertisement---

‘माझ्या घरातील सर्वात धारदार चाकूचे नाव वीरू’; दिग्गज गोलंदाजाकडून सेहवागला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 7:34 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आज (२० ऑक्टोबर) ४३ वर्षांचा झाला. सोशल मीडियावर त्याला त्याच्या चाहत्यांकडून आणि क्रिकेट दिग्गजांकडून खूप शुभेच्छाचे संदेश मिळत आहेत. अगदी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एक मजेदार खुलासा करत वीरेंद्र सेहवागला वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. डेल स्टेनने ट्विट करत म्हटले आहे की, ‘त्याच्या घरी धारदार चाकूचे वीरू असे टोपणनाव आहे कारण तो सर्व काही ‘कट’ करतो.

https://twitter.com/DaleSteyn62/status/1450700662099087362?t=IYS9B5AfmmuF2GDXO4JClA&s=19

 

डेल स्टेनने ट्विट केले आणि थोडक्यात लिहिले की, ‘माझ्या घरातील धारदार चाकूचे नाव वीरू आहे, तो काहीही ‘कट’ करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा आणि हा वाढदिवस आनंदाचा ठरो.’ डेल स्टेनने सेहवागचा ‘अपर कट शॉट’ खेळतानाचा एक जबरदस्त फोटो अपलोड केला आहे. सेहवागचे आवडते शॉट हे ‘कट शॉट’ आणि ‘अपर कट’ राहिले आहेत. म्हणूनच डेल स्टेनने त्याच्या चाकूचे नाव सर्वकाही ‘कट’ करू शकणाऱ्या सेहवागच्या नावावर ठेवले आहे. वीरेंद्र सेहवाग आणि डेल स्टेन यांनी एकमेकांविरुद्ध बरेच क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्रीही राहिली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि डेल स्टेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या पोस्टने ते चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.

डेल स्टेनच्या मते, वीरेंद्र सेहवाग हा जगातील सर्वात आक्रमक आणि धोकादायक सलामीवीर होता. त्याने काही वर्षांपूर्वी विधान केले होते की, सध्याचे भारतीय सलामीवीर चांगले आहेत पण सेहवाग सारखा महान सलामीवीर भारताकडून झालेला नाही. कोणताही गोलंदाज त्याच्यासमोर गोलंदाजी करण्यापूर्वी घाबरायचा. सेहवाग व्यतिरिक्त डेल स्टेनने आपल्या देशाचे माजी अनुभवी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की ‘पोएट्री इन मोशन … हॅपी बर्थडे लाइटनिंग.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---