बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आपली लाज वाचवण्यासाठी मैदानावर उतरला होता. कारण आधीच्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून बांगलादेशने मालिका खिशात घातली आहे. मात्र चौथ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल क्रिस्टियन याने बांग्लादेशचा सर्वात अनुभवी गोलंदाज शाकिब अल हसनच्या एकाच षटकात 5 खणखणीत षटकार लगावले. टी20 मध्ये एकाच षटकात 6 षटकार लावण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो थोडक्यात राहिला.
बांगलादेश विरुद्ध लागोपाठ तीन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करत यजमान बांगलादेशने फक्त 104 धावा केल्या. अँड्र्यू टाई आणि मिशेल स्वेपसनने 3-3 विकेट घेतल्या; तर जोस हेजलवुडने 2 फलंदाजांना माघारी पाठवत विजयात मोलाचा वाटा उचलला.
THIRTY RUNS
Dan Christian took a liking to Shakib Al Hasan! #BANvAUS pic.twitter.com/RW9CJJSm7Y
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2021
विजयासाठी आवश्यक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट लवकर गमावली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या क्रिस्टियनने सामन्यात रंगत आणली. क्रिस्टियनने चौथ्या षटकात बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनला तब्बल 5 षटकार लगावले. षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूवर त्याने जोरदार प्रहार करत चेंडू सीमापार केले. चौथ्या चेंडूवर तो शांत राहिला. परंतु पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा जोरदार प्रहार करत खणखणीत षटकार खेचले.
https://twitter.com/rishobpuant/status/1424024458713460738?s=20
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 6 चेंडूवर 6 षटकार खेचण्याचा विक्रम केला आहे. 2007 साली झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला 6 षटकार लागावले होते. त्यानंतर याचवर्षी मार्च मध्ये वेस्टइंडिजच्या कीरोन पोलार्डने श्रीलंकेच्या अकीला धनंजयाच्या षटकात 6 षटकार लगावत युवराजच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
दरम्यान, बांगलादेशने क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या टी20 सामन्यातील विजयानंतरही बांगलादेश 3-1 ने या मालिकेत आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर खाते उघडले! सलग चौथ्या पराभवातून थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलिया, ‘हा’ खेळाडू ठरला विघ्नहर्ता
जसप्रीत बुमराहची फलंदाजी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; भारतीय कर्णधार होतोय ट्रोल
वाचलंत का? उर्वरित आयपीएल हंगामासाठी खूप कठोर आहेत ‘कोरोना प्रोटोकॉल’, चूकल्यास कारवाईही होणार