---Advertisement---

अन्यथा संघाच्या नावातून ‘हैदराबाद’ काढून टाकावे लागेल; माजी मंत्रींची ‘ऑरेंज आर्मी’ला धमकी

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 9:00 AM
---Advertisement---

येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल २०२१ चा थरार पाहायला मिळू शकतो. याच पार्श्वभमीवर १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात ५ खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा जास्त बोली लावण्यात आली होती. तसेच ८ संघांनी मिळून संपूर्ण लिलावात एकूण ५७ खेळाडूंवर १४५ कोटींची बोली लावली.

या लिलावात डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद संघाने सर्वात कमी खेळाडू खरेदी केले. त्यातही त्यांनी एकाही स्थानिक खेळाडूची निवड केली नाही. यानंतर स्थानिक खेळाडूंना दुर्लक्षित केल्याने हैदराबाद संघ मोठ्या विवादात अडकला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी लिलावाच्या समाप्तीनंतर हैदराबाद संघाला चेतावणी दिली आहे.

नागेंद्र यांनी हैदराबाद संघाच्या मालकांना आणि संघ व्यवस्थापकांना धमकावले आहे. तसेच हैदराबादमधून एकाही स्थानिक खेळाडूला संधी न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सनरायजर्स हैदराबाद संघात स्थानिक खेळाडूंना स्थान नाही मिळाले, ही खूप निराशाजनक बाब आहे. इथे कौशल्यवान खेळाडूंची कमतरता नाही. हैदराबाद संघाला स्थानिक खेळाडूला संधी द्यावी लागेल अन्य़था संघाच्या नावातून हैदराबाद काढून टाकावे लागेल.”

मोहम्मद अझरुद्दीनने देखील ट्विट करत मांडले होते मत

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन देखील लिलावाच्या समाप्तीनंतर खुश नसल्याचे दिसून आले होते. त्यांनी लिलाव पार पडल्यानंतर ट्विट केले होते. ज्यात त्यांनी सनरायजर्स हैदराबाद संघावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी संघाच्या ट्विटर हॅन्डलला टॅग करत लिहिले होते की, “सनरायझर्स हैदराबाद संघात हैदराबादचा एकही खेळाडू नाही हे पाहून खूप दुःख होत आहे.”

असा असेल आयपीएल २०२१ चा सनरायझर्स हैदराबाद संघ

लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, मिशेल मार्श, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू –  
केदार जाधव(२ कोटी), मुजीब झारदान(१.५० कोटी), जे सुचिथ(३० लाख)

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ‘या’ २ बदलांसह उतरेल टीम इंडिया, पाहा संभावित प्लेइंग XI

त्याने खुद्द धोनीला म्हणायला भाग पाडले की, ‘तो माझ्यासाठी गोलंदाजीतला सचिन आहे’

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची भारत, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनाही भूरळ; पाहा खास ट्विट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---