भारतीय क्रिकेटला दिग्गज फलंदाजांचा मोठा वारसा आहे. आत्तापर्यंत भारताकडून सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर ते विराट कोहली, रोहित शर्मापर्यंत अनेक महान फलंदाज खेळले. त्यातही १९९० चे किंवा २०१० चे दशक म्हटलं की सर्वांना आठवते ती सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांची फलंदाजी. आजही त्यांना क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांचा मान मिळतो.
या भारतीय फलंदाजांनी २ दशके अक्षरश: क्रिकेट जगतावर वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे त्यांच्या समोर गोलंदाजी करण्याचे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर एक आव्हान असायचे. त्यांना लवकर बाद करण्यात यश आले, तर प्रतिस्पर्धी संघासाठी आनंदाची पर्वणी असायची.
असे असताना जर असं सांगितलं की सचिन, द्रविड व गांगुलीला एकाच गोलंदाजाने शून्यावर बाद करण्याचा कारनामा केला आहे, तर अनेकांना ते खोटे वाटेल. पण हे खरे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सचिन, द्रविड व गांगुलीला न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू डॅनिएल विट्टोरीने शून्यावर बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन, द्रविड आणि गांगुली या तिघांनाही शून्यावर बाद करणारा विट्टोरी हा एकमेव गोलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. सचिन, द्रविड आणि गांगुली हे शून्यावर अनेकदा बाद झाले आहेत, पण ते वेगवेगळ्या गोलंदाजांकडून शून्यावर बाद झाले आहेत. पण या तिघांनाही शून्यावर बाद करण्याचा पराक्रम करत विट्टोरीने इतिहास रचला आहे.
न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू डॅनिएल विट्टोरी हा रिचर्ड हॅडली नंतरचा न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने नेहमीच खालच्या फळीत फलंदाजी करताना चांगले योगदान दिले. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०५ विकेट्सही घेतल्या. तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
विट्टोरीने त्याच्या कारकिर्दीत ११३ कसोटी सामन्यात ६ शतके आणि २३ अर्धशतकांसह ४५३१ धावा केल्या, तसेच गोलंदाजीत ३६२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर २९५ वनडे सामन्यात त्याने २२५३ धावा केल्या आणि ३०५ विकेट्सही घेतल्या. एवढेच नाही तर ३४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत २०५ धावांसह ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंचवीस वर्षांपूर्वी चेपॉकवर घडलेला इतिहास, भारताविरुद्ध ‘या’ फलंदाजाने केलेली तुफान फटकेबाजी
बॉलर नहीं, फिनिशर हू मैं! अश्विनने राजस्थानला मिळवून दिलं ‘क्वालिफायर १’चं तिकीट, होतंय कौतुक
राजस्थानच्या चेन्नईवरील विजयाने लखनऊला धक्का, फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी संजूपुढे गुजरातचे आव्हान